पुणे- पावसाळा,कोरोना, आणि त्यानंतर आता तिसऱ्या वर्षी होऊ घातलेला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यासाठी महापालिका हद्दीतील संपूर्ण पालखी मार्ग आणि आजूबाजूच्या परिसरातील अवस्था याबाबत अडीअडचणी ,समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही होण्यासाठी अगोदर एक सर्वपक्षीय बैठक महापालिका प्रशासनाने घेऊन नियोजन करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी येथे केली आहे.
सोहळ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मंडप व्यवस्था, पालखी मार्गांवरील रस्त्यांची झालेली दुरावस्था , वृक्ष छाटणी , तसेच पालखी सोहळ्याच्या दिवशी 24 तास पाणी मिळावे याकरिता पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक विशाल धनवडे, गजानन पंडित, विभाग प्रमुख चंदन साळुंके, स्वातीताई कथलकर, भाऊ शिंदे, योगेश खेंगरे , अनिकेत थोरात , अनिल ठोंबरे, सनी मुसळे यादी शिवसैनिक उपस्थित होते.

