राणे यांच्या निषेधार्थ युवा सेनेच्या वतीने पुण्यात गुडलक चौकात आंदोलन

Date:

पुणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अनुद्गार काढल्याप्रकरणी पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. युवा सेनेच्यावतीने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास गोखले स्मारक चौकात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिवसैनिकांनी राणे यांच्या मालकीच्या डेक्कनमधील आर डेक्कन मॉलसमोर घोषणबाजी करत दगडफेक केली.

केंद्रीय मंत्री राणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने गोखले स्मारक चौकात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने शिवसैनिक गोळा झाले. आंदोलन सुरू असतानाच संतप्त शिवसैनिकांनी राणे यांच्या मालकीच्या आर डेक्कन मॉलवर दगडफेक केली. तसेच मॉलसमोर पुन्हा घोषणाबाजी करण्यात आली. दगडफेकीत मॉलच्या प्रवेशद्वाराच्या काचा फुटल्या आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी डेक्कन पोलीस ठाण्याकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पुण्यात सात ठिकाणी आंदोलन, शहरात कुठेही उद्रेक नाही- सहपोलीस आयुक्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत करण्यात आलेल्या टीकेमुळे पुण्यात सात ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये डेक्कन, हडपसर, फुरसुंगी, हडपसर गाडीतळ, सिंहगड वडगाव पुल, चतःशृंगी शिवाजी चौक, बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. ठिकठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, अशी माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.

राणेंविरोधात गुन्हा दाखल करा; शिवसेनेचे विविध पोलीस ठाण्यात निवेदन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.

राणे यांचे वक्तव्य फौजदारी गुन्हा दाखल करण्यासारखे आहे. त्यामुळे राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवा सेनेचे सनी गवते यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार अर्जाद्वारे केली आहे. त्याशिवाय शिवसेनेचे पुणे शहर समन्वयक, शिवसेना लिगल सेलचे पुणे जिल्हा प्रमुख अ‍ॅड. संभाजी थोरवे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची सायबर तज्ञांमार्फत चौकशी करण्यात यावी. त्यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. शिवसेना महिला आघाडीच्या स्वाती ढमाले यांच्यावतीने पौड पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याबाबत अतिशय निंदणीय वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करावा. याप्रकरणी मुळशी तालुक्यातील महिला वर्गाच्यावतीने वक्तव्याचा निषेध करण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...