राजी सिनेमानंतर आता अमृता खानविलकर दिसणार हिंदी वेबसीरिजमध्ये !

Date:

धर्मा प्रॉडक्शन्सच्या राजी सिनेमात पाकिस्तानी गृहिणी मुनिराच्या भूमिकेत दिसलेल्या अमृता खानविलकरने ह्या भूमिकेतून ब़ॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवलाय. अमृताच्या ह्या भूमिकेला फक्त चाहत्यांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही दाद मिळाली. राजी चित्रपटातून अमृताने दाखवून दिलं, की ती दिसायला सुंदर आहेच पण एक चांगली अभिनेत्रीही आहे. राजीच्या मुनिरा भूमिकेमूळे अमृताला ब़ॉलीवूडची कवाडं खुली झाली.

राजीच्या शालीन आणि घरंदाज गृहिणीनंतर आता अमृता आपल्या चाहत्यांना एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या अनुसार, अमृताने आपल्या आजवरच्या करीयरमध्ये कधीही अशी भूमिका केलेली नाही. एवढी ही भूमिका तिच्यासाठी वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे.

अमृताचा लवकरच डिजीटल दूनियेत डेब्यू होतो आहे. तिच्या नव्या वेबसीरिजमध्ये असलेली ही तिची भूमिका रहस्यमय स्वरूपाची आहे.

सूत्रांच्या अनुसार, अमृता सध्या आपल्या करीयरच्या शिखरावर आहे. ह्या शिखरावर गेल्यावर अर्थातच कलाकारांना अष्टपैलू भूमिका करण्याची इच्छा असते. अमृता नुकतीच एका घरंदाज गृहिणीच्या भूमिकेत राजीमध्ये दिसली होती. त्यानंतर ती आता एका बोल्ड आणि हिंसक भूमिकेत दिसेल.

लवकरच सुरू होणा-या ह्या वेबसीरिजमध्ये अमृता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अमृताच्या ह्या भूमिकेच्या आसपासच कथानक विणलं गेलं आहे.

ह्याविषयी अमृता सांगते, “मला करीयरच्या ह्या वळणावर विविध प्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा आहे. रूढिबध्द भूमिका न करता काहीतरी वेगळं करण्याची आणि त्यासाठी कोणत्याही कसोटीवरही माझी उतरण्याची तयारी आहे. माझी ही नवी भूमिकाही माझी कसोटी पणाला लावणारी आहे.”

ब्लॉकबस्टर राजी चित्रपटातल्या मुनिरा भूमिकेमुळे अमृताचं सर्वच स्तरांतून कौतुक झालं. ह्याविषयी ती सांगते, “मला अजूनही भरभरून प्रतिक्रिया मिळतायत. ह्या भूमिकेसाठी मी घेतलेली मेहनत कामी आल्याचा आनंद वाटतोय. माझे चाहते, फिल्मइंडस्ट्रीतली मित्र-मंडळी ह्यांच्याकडून पाठ थोपटली जातेय, त्यामूळे आता अजून जबाबदारीने काम करायची जाणीवही मला होतेय. “

अमृताच्या नव्या वेबसीरिजविषयीची माहिती अद्याप गुलदस्त्यातच असली तरीही, सूत्रांच्या अनुसार, अनेक खून केल्याचा आरोप असलेल्या अपराध्याच्या भूमिकेत अमृता ह्यात दिसणार असल्याचं समजतंय.

आपल्या भूमिकेविषयी अमृता म्हणते, “ ह्या भूमिकेत मी तुम्हांला ग्रे-शेड्समध्ये दिसेन. ही एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. जिचं आयुष्य आणि त्यातले निर्णय खूप बोल्ड आहेत. मला आनंद आहे, की राजीनंतर आता मला अशा भूमिका ऑफर होउ लागल्यात. आज सिनेक्षेत्रात अशा कथांची आणि अशा भूमिकांची खूप गरज असल्याचं मला वाटतं. ”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्व.यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण केले,याच विचारांची सध्या महाराष्ट्राला गरज

-माजी आमदार मोहन जोशी पुणे : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी...

४०० केव्ही वाहिन्यांना अंडर व्होल्टेजचा धोका;ग्रामीण भागात विजेचे अर्धा तास भारनियमन

पुणे, दि. १२ मार्च २०२५: विजेची मागणी वाढल्यामुळे महाराष्ट्र व गुजरात...

सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हिना खान आणि रॉकीच्या लग्नाच्या केटरिंगसाठी एक चविष्ट लढाई

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हिना खान आणि रॉकी...