मुंबई : ‘फिर से’ नंतर आता अमृता फडणवीस यांचा एक नवा पैलू ‘यह पल’ या इंदू
सरकारमधल्या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘फिर से’ या अमिताभ बच्चन यांच्यासोबत च्या
पहिल्या विडिओमध्ये अमृता फडणवीस कॉलेजच्या एका मुलीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या
गाण्यानंतर आता त्याहून काहीसं वेगळं गाणं घेऊन त्या प्रेक्षकांसमोर आल्या आहेत.
हे गाणं म्हणजे मधूर भंडारकर यांचा बहुचर्चित सिनेमा ‘इंदू सरकार’ या चित्रपटातील ‘यह
पल’… आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आपलं आयुष्य घडवत असतो. यापैकी कुठल्याही क्षणात
आपण अडकून पडल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि म्हणूनच ‘यह पल में
संभल, इस पल से निकल’ असं म्हणत अमृता फडणवीस प्रत्येकालाच सावध करत आहेत.
अनू मलिक यांच्या संगीताने सजलेल्या या गाण्याचे बोल आपल्या अनोख्या संवादांसाठी
ओळखले जाणारे सुप्रसिध्द संवाद लेखक संजय छैल यांनी लिहिले आहेत.आपल्या संवादाच्या
जोरावर ‘रंगीला’ चित्रपटातल्या मुन्नाला प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून देणारे संजय छैल
यांनी आपल्या लेखणीची जादू पुन्हा दाखवत ‘यह पल में संभल’ हे गाणं लिहिलं आणि गीतकाराच्या
शब्दांना अचूक न्याय देत तितक्याच ताकदीने अमृता फडणवीस यांनी हे गाणं सादर केलं आहे.
तेव्हा सत्तरीच्या दशकातल्या गीतांची आठवण करून देणाऱ्या क्षणभंगूर क्षणांच्या या गाण्याचा
आस्वाद नक्की घ्या