पुणे-उद्गार संस्थेने आपल्या दशकपूर्तीचे औचित्य साधून येत्या शुक्रवारी( ता. २) ‘मंथन’ या अनोख्या मैफलीचे आयोजन केले आहे. शकुंतला शेट्टी सभागृह, कर्नाटक हायस्कूल , कर्वे नगर येथे सायंकाळी ६ वाजता ही मैफल होणार आहे. गुरू रोहिणीताई भाटे यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या या मैफलीत ‘त्रिविधा,’ ‘चैतन्य,’ ‘राधा,’ ‘सा-रंगी’ आणि ‘कर्म’ यावर आधारित विविध नृत्याविष्कारांची अनुभूती रसिकांना एकाच मंचावर अनुभवता येणार आहे.
संगीतकार केदार पंडित, प्रसिद्ध तबलावादक पं अरविंदकुमार आजाद, शैलेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून तसेच कथक नृत्यांगना आसावरी पाटणकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारत आहे. तरी या मैफलीचा लाभ रसिक पुणेकरांनी घ्यावा, असे आवाहन उद्गारतर्फे करण्यात येत आहे.

