‘ताल,’ ‘लय’ अन् तृप्त ‘नयन’

Date:

तालायनच्या श्रद्धा सुमन मैफलीस रसिकांची भरभरून दाद

पुणे : संथ लयीत येणाऱ्या जागा आणि जलद गतीत साधला जाणारा विलक्षण आविष्कार यातून विश्वविख्यात तबलावादक पद्मश्री पंडित स्वपन चौधरी यांनी तालसौंदर्य उलगडले. तर पदन्यासातील चपळाई व संपूर्ण देहबोलीतून रसिकांना खिळवून ठेवणारी नजाकत यातून ज्येष्ठ नर्तक पं. राजेंद्र गंगाणी

यांनी विलोभनीय कथक नृत्याविष्कराचे दर्शन  घडविले. ‘ताल,’ अन् ‘लयी’चा हा अनोखा संगम पाहून रसिकांचे ‘ नयन’ तृप्त झाले.निमित्त होते प्रसिद्ध तबलावादक पंडित अरविंदकुमार आजाद यांच्या

तालायन म्युझिक सर्कलतर्फे झालेल्या श्रद्धा सुमन मैफिलीचे. पद्मविभूषण पंडित किशन महाराज यांच्या स्मरणार्थ देशात एकमेव होणारी ही मैफल काल आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पार पडली.

पूर्वार्धात जयपूर घराण्याचे प्रसिद्ध नर्तक पं. राजेंद्र गंगाणी यांनी शिवस्तुतीने आपल्या सादरीकरणास प्रारंभ केला. पारंपारिक तीनतालातील रचना, उठाण, थाट, परण यातून गंगाणी यांनी कथक नृत्याचे सौंदर्य उलगडले. पाण्यातून चालणा-या नावेची गती, तिचे हेलकावे, घुंगरू व तबल्याच्या मिलाफातून निर्माण झालेला डमरूचा सुमधुर नाद व गणेश परण रसिकांना विशेष भावले. पंडित अरविंदकुमार आजाद यांच्या तबल्यावर लाभलेल्या दमदार साथीने सादरीकरणास वेगळ्या उंचीवर नेले.

 तबला व पखवाजाच्या संगतीतून बहारदार दिगलबंदी पेश करत त्यांनी आपल्या प्रस्तुतीची सांगता केली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विश्वविख्यात तबला वादक पंडित स्वपन चौधरी यांनी स्वरमंचाचा ताबा घेतला. त्यांची पहिलीच थाप तबल्यावर पडली आणि रसिकांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटासह त्यांना दाद दिली. त्यांची तीनतालाची लयकारी लाजवाब होती. पेशकार, कायदा, रेले व आपल्या गुरूंच्या दुर्मिळ रचना सादर करत तबल्यातील गोडव्याची झलक त्यांनी उपस्थितांना दाखविली. त्यांनी पेश केलेल्या जयपूर घराण्यातील चक्रधार रचनेला रसिकांची उत्स्फुर्त दाद लाभली. पंडित स्वपन चौधरी यांच्या तबल्यावर थिरकणाऱ्या जादूई बोटांनी रसिकांवर अक्षरशः मोहिनी टाकली. या मैफलीतून जयपूर, लखनौ, बनारस घराण्यातील प्रतिभावंत कलाकारांचा घडलेला वैशिष्टयपूर्ण संगम पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले.

रसिकांचा हिरमोड.. पं.आजाद यांची दिलगिरी

दरवर्षी पुण्यात श्रध्दा सुमन मैफलीचे आयोजन केले जाते. अभिजात शास्त्रीय कलेत ध्यासाने कार्यरत असणाऱ्या प्रतिभावंत कलावंतांना या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. परंतु, यंदाच्या मैफलीस अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद लाभला. यामुळे ऐनवेळी कार्यक्रमस्थळी आलेल्या १०० हून अधिक रसिकांना परत जावे लागल्याने त्यांचा हिरमोड झाला. याबद्दल आयोजक अरविंद कुमार आजाद यांनी दिलगिरी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...