…अन् रंगली कौटुंबिक स्वरसंध्या

Date:

पं. डी. के. दातार यांच्या स्मरणार्थ मैफल

पुणे : व्हायोलिनच्या सूमधुर नादाने सजलेले वादन… मनाचा ठाव घेणारे अल्हाददायक सूर… अन् अशा भारावलेल्या वातावरणात तल्लीन झालेले रसिक…अशी दुहेरी अनुभूती देणारी व्हायोलिन वादनाची व गायनाची स्वरसंध्या काल येथे रंगली. ज्येष्ठ व्हायोलिन वादक पं. डी. के. दातार यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे ज्येष्ठ शिष्य व्हायोलिन वादक रत्नाकर गोखले व त्यांच्या कुटुंबियांनी या मैफिलीचे आयोजन केले होते. बेडेकर गणपती, पौड रस्ता येथे पार पडलेल्या या कौटुंबिक स्वरसंध्येला रसिकांची उत्स्फूर्त दाद लाभली.

कार्यक्रमाचा प्रारंभ पं. दातार यांच्या स्नुषा आणि प्रसिद्ध लेखिका डॉ. स्मिता दातार यांनी लिहिलेल्या ‘डी. के. दातार, द व्हायोलिन सिंग्ज’ या पुस्तकाच्या प्रकाशनाने झाला. सुप्रसिद्ध गायक, विचारवंत व संगीत मार्गदर्शक पं. डॉ. विकास कशाळकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. या पुस्तकातून पंडित दातार यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य असून पुस्तकाचे वाचन मूल्य आणि अभ्यासपूर्ण लेखन उच्च दर्जाचे असल्याचे मत कशाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.

यानंतर रत्नाकर गोखले यांचे व्हायोलिन वादन झाले. आपल्या गुरूचा आवडता राग ‘ मधुवंती ‘ त्यांनी प्रथम सादर केला. या रागात विलंबित मध्य आणि द्रुत अशा तीन रचना त्यांनी सादर केल्या. यावेळी ‘ मधुवंती ‘ या रागातील स्वरसौंदर्य अत्यंत सफाईदारपणे उलगडून दाखवले. समेवर येण्याच्या प्रत्येक जागेला श्रोत्यांची वाहवा प्राप्त झाली. गोखले यांच्या प्रस्तुतीची सांगता मिश्र पिलू रागातील दादरा वादनाने झाली. गुरुबंधू राजन माशेलकर यांनी आपल्या सहप्रस्तुतीत गुरूंच्या वादन शैलीचे यथार्थ दर्शन घडविले. लयकारीकडे झुकलेल्या या वादनास तेवढीच दर्जेदार व बहारदार तबला साथ पं. अरविंदकुमार आझाद यांनी देत मैफिलीची उंची वाढवली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांची परंपरा पुढे नेणारे त्यांचे  शिष्य हेमंत पेंडसे यांचे सुश्राव्य गायन झाले. पेंडसे यांची सुरुवातीस ‘ श्याम कल्याण ‘ पेश करत रसिकांची मने जिंकली. त्यानंतर

‘ शिवअभेणी ‘ हा दुर्मिळ राग गाऊन रागचिंतनातील आपले वेगळेपण त्यांनी दाखवून दिले. त्यांनी सादर केलेली द्रुतरचना ‘ नित रहे मगन तोहे’ उपस्थितांना विशेष भावली. पेंडसे यांनी आपल्या सादरीकरणाची सांगता स्वामी स्वरूपानंद रचित भजन ‘ कृपावंत थोर’ या बंदिशीने केली. श्री भरत कामत (तबला) आणि श्री स्वानंद कुलकर्णी (संवादिनी) यांची समर्पक साथ पेंडसे यांना लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय दामले यांनी केले. या कार्यक्रमास पुण्यातील ज्येष्ठ व्हायोलिनवादकांची उपस्थिती लक्षणीय होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...