कचऱ्यातील ७० हजारांचे सोने परत केले -स्वच्छता कर्मचारी महिलेची कामगिरी
पुणे – आजच्या काळत नेहमी बोलले जाते की लोक आता प्रमाणिक राहीले नाहीत परंतु नैतिकता आणि प्रामाणिकपणाचे जीवंत उदाहरण नुकतेच भोसरीत घडलेल्या घटनेने दिसून आले. पिंपरी-चिंचवड येथे बीव्हीजी इंडिया कचरा व्यवस्थापन सेवा विभागातकरणाऱ्या या लता चव्हाण यांनी येथील निवासी मिसेस शाहु यांचे सोन्याचे दागिने कचऱ्यातून शोधुन परत केले आहेत.
लता चव्हाण यांस मिसेस शाहू यांच्याकडून समजले की मिसेस शाहुंनी चुकुन त्यांची सोने व त्याची पावती ठेवलेली बॅग कचऱ्यात फेकली आहे. बीव्हीजी कचरा संकलन सेवा विभागाद्वारे मिसेस शाहु राहत असलेल्या परिसरातील कचरा घरोघरी दरवाजावर जाऊन गोळा केला जातो. हे सोने जवळपास ७० हजार रूपये किमतीचे होते.
यानंतर लता यांनी तातडीने फेकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून सोने असलेली बॅग आणि पावती शोधून काढली. बॅग शोधल्यानंतर लता यांनी श्रीमती शाहू यांच्याकडून बक्षीस स्वीकरण्यास देखील नकार दिला आणि त्यांनी आपल्या कामाशी एकनिष्ट राहुन प्रामाणिकपणे संघटनेच्या नियमांचे पालन केले.
आजच्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना, बीव्हीजी इंडियाचे सीएमडी एच.आर गायकवाड म्हणाले, लता चव्हाण यांनी आज सिद्ध केले की ‘मानवता अजुनही शिल्लक आहे’ ही केवळ आमच्या दृष्टीनेच नव्हे तर बीव्हीजी इंडियासाठीही जीवनाचा एक मार्ग आहे. मला त्यांच्याबद्दल आणि येथे कार्य करणार्या लोकांबद्दल अभिमान वाटतो, त्यांच्या ह्या प्रामाणिक कृतीमध्ये खरोखरच बीव्हीजीद्वारा निर्धारीत मूलभूत मूल्य प्रतिबिंबित होत आहेत.
लता चव्हाण म्हणाल्या “मी डम्पिंग ग्राऊंडवर सोने शोधू शकले याचा मला आनंद झाला. मला वाटले की श्रीमती शाहूंचे सोने शोधून परत णे ही माझी जबाबदारी होती