लखनौ- रसिकांच्या मनावर कायमचे अधिराज्य गाजविणार्या अखेरच्या सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे वैक्तिक खाजगी आयुष्य आता रसिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे . त्याला कारण हि तसेच झाले आहे हे दोघेही गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतंत्र राहात असल्याच्या गौप्यस्फोट समाजवादी पक्षाचे बडतर्फ नेते अमर सिंह यांनी वाराणसीमध्ये पत्रकारांशी बोलताना केला आहे . कधी काळी अमिताभच्या कुटुंबाशी आणि अंबानीच्या कुटुंबाशी जवळीक अमरसिंह यांची होती हे सर्वश्रुत आहे .अंबानी यांच्याहून अधिक रसिकांना अमिताभ बद्दलच्या या वक्तव्याने जास्त धक्का बसला आहे .
नेमके यावेळी अमर सिंह काय म्हणाले?
“मीडियाच्या मते, मीच अंबानी कुटुंबात भांडण लावलं. मात्र अंबानी कुटुंबातील राडा हा पैशाच्या कारणावरुन झाला. जिथे जिथे वाद आहे, तिथे तिथे अमर सिंहचं नाव जोडलं जातं. ऐश्वर्या बच्चन आणि जया बच्चन यांनाही मीच वेगळं केलं, असा आरोप मीडियाने माझ्यावर ठेवला.
माझा अमिताभ बच्चन यांच्याशी संबध आला नव्हता , तेव्हापासून अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे वेगवेगळ्या घरात राहात होते. प्रतीक्षा आणि जलसा या वेगवेगळ्या बंगल्यात दोघे राहात होते. तेव्हापासून ते वेगवेगळे राहतात. मात्र मीडियाने ते माझ्याच नावे ठोकून दिलं.आणि मी भांडणे लावली असा आरोप केला
पहा नेमके ते काय म्हणाले …