मुंबई–महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित ठाकरे यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील काही दिवस तिथेच त्यांच्यावर उपचार होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरेंना मागील काही दिवसांपासून सर्दी आणि ताप जाणवत होता. त्यांची काल चाचणी करण्यात आली असता, ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज दुपारी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतर कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत.