अनिकेत पोरवाल व तनिष जैन यांची शतकी भागीदारी;
पुणे, 31 जानेवारी 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एम 3 करंडक आंतर क्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत तनिष जैन(नाबाद 74 धावा) व अनिकेत पोरवाल(79धावा) यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर अंबिशियस क्रिकेट अकादमी संघाने केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा 8 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात केडन्स क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा डाव 44.3 षटकात 200 धावावर संपुष्टात आला. सलामीची जोडी झटपट बाद झाल्यानंतर प्रद्युम्न चव्हाण(29धावा) व कौशल तांबे(19धावा) यांनी चौथ्या गड्यासाठी 66 चेंडूत 33 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हर्षल काटेने 70 चेंडूत 6चौकार व 1 षटकारांसह 69 धावा व इझान सईदने 34 चेंडूत 31 धावा यांनी आठव्या गड्यासाठी 59 चेंडूत 63 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. अंबिशियस क्रिकेट अकादमी कडून सचिन भोसले(2-41), व्यंकटेश दराडे(1-19), तनिष जैन(1-32), वैभव विभूते(1-32), नरेंद्र पाटील (1-35) यांनी सुरेख गोलंदाजी करत केडन्स संघाला 200 धावांवर रोखले.
201 धावांचे लक्ष्य अंबिशियस क्रिकेट अकादमी संघाने 33.2 षटकात 2बाद 203 धावा करून पूर्ण केले. यामध्ये सलामीचा फलंदाज सिद्धांत दोशीने 19 धावावर बाद झाला. त्यानंतर अनिकेत पोरवालने 66 चेंडूत 10 चौकार व 3 षटकाराच्या मदतीने 79 धावा, तर तनिष जैनने 95 चेंडूत 8चौकार व 1षटकाराच्या मदतीने नाबाद 74 धावा चोपल्या. अनिकेत पोरवाल व तनिष जैन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 137 चेंडूत 140 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. तनिष जैनने अभिषेक पवार(नाबाद 12धावा)च्या साथीत 25 चेंडूत 31 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.सामन्याचा मानकरी तनिष जैन ठरला.
स्पर्धेतील विजेत्या अंबिशियस क्रिकेट अकादमी संघाला करंडक, तर उपविजेत्या केडन्स संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमसीएचे अध्यक्ष विकास काकतकर, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, एमसीएचे सचिव रियाज बागवान, एमसीएचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी खजिनदार अजय शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
केडन्स क्रिकेट अकादमी: 44.3 षटकात सर्वबाद 200 धावा(हर्षल काटे 69(70,6×4,1×6), इझान सईद 31(34,2×4,1×6), प्रद्युम्न चव्हाण 29(59,4×4), कौशल तांबे 19(43), सिद्धेश वरघंटी 16, सचिन भोसले 2-41, व्यंकटेश दराडे 1-19, तनिष जैन 1-32, वैभव विभूते 1-32, नरेंद्र पाटील 1-35) पराभूत वि.अंबिशियस क्रिकेट अकादमी: 33.2षटकात 2बाद 203 धावा(सिद्धांत दोशी 19(16), अनिकेत पोरवाल 79(66, 10×4, 3×6), तनिष जैन नाबाद 74(95, 8×4, 1×6), अभिषेक पवार नाबाद 12(13), शुभम हरपाळे 1-47, यतीन मंगवाणी 1-56); सामनावीर-तनिष जैन; अंबिशियस क्रिकेट अकादमी 8 गडी राखून विजयी.
इतर पारितोषिके:सर्वोत्कृष्ट फलंदाज: स्वप्नील फुलपगार(डेक्कन जिमखाना, 295धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: इझान सय्यद(11विकेट, केडन्स)
मालिकावीर: तनिष जैन(अंबिशियस, 199 धावा व 9 विकेट);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक: स्वप्नील फुलपगार(13 विकेट, डेक्कन जिमखाना);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक: पवन शहा(4 झेल व 3 धावबाद, व्हेरॉक)

