पुणे, आपले फार्म प्लाॅट शहराच्या जवळ आणि प्रदुषणमुक्त हवेत असावे असे अनेकांचे स्वप्न असते. इन्फ्रा लॅंडवर्ल्ड प्रा. लि. कंपनी अंबर लेक व्ह्यूने हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एक पाउल उचलले आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत संचालक सारंग कोळेकर यांनी दिली.
यामध्ये १०२२ स्क्वेअर मिटरचे अनेक प्लाॅटस् आहेत. ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात आनंदाचे दिवस घालवायचे आहेत त्यांच्यासाठी नक्कीच ही एक पर्वणी ठरेल. लहान मुलांबरोबरच प्रौढांना देखील येथे शनिवार व रविवार घालवण्यासाठी नक्कीच मजा येईल. येथून पिंपोली आणि कातरकडक धरणाचे सौंदर्य अनुभवता येईल. येथे व्यतीत केलेले क्षण यादगार बनतील असा विश्वास कोळेकर यांनी व्यक्त केला.
कोळेकर पुढे म्हणाले, इन्फ्रा लॅंडवर्ल्डला वेळेत उत्तम सेवा देणारी राज्यातील पहिल्या क्रमांकाची कंपनी बनण्याचे ध्येय ठेवले असून येत्या ५ वर्षात जवळपास ५ हजार ग्राहक बनविण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून लोकांची निसर्गाशी मैत्री होईल, अशी आशा आहे.
यावेळी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किसन पाटील म्हणाले, धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एक ब्रेक हवा असतो. निसर्गाच्या सानिध्यात लहानांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांना येथे मनसोक्त आनंद घेता येईल.
शारिरीक स्वास्थ्याचे महत्त्व लक्षात घेता योगा आणि ध्यान केंद्राची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच मुलांसाठी एरीया, व्यायामशाळा, बास्केटबॉल, बॅडमिंटन कोर्ट इत्यादी सुविधांचा समावेश आहे. मासेमारी, बोटींग, सेंद्रिय शेती, व्यावसायिकपणे व्यवस्थापित रिसाॅर्ट देखील असणार आहेत.
अंबर लेक व्ह्यू वाजवी किंमतीत उत्तम सुविधा देत आहे. हिंजवडी पुलापासून १७ किमी अाहे. धावपळ न करता अगदी ४०-४५ मिनिटात शहरात पोहोचू शकतो. हिंजवडी हे केवळ आयटी पार्कसाठी प्रसिद्ध नसून येथे विस्तारत चाललेल्या शैक्षणिक संस्था, हाॅस्पिटल, वसाहती अशा अनेक गोष्टीमुळे येथे गुंतवणूक करत आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गदेखील येथून जवळ आहे.
संचालिका श्वेता कुंभालकर अष्टानकर म्हणाल्या, हा प्रकल्प पुणे आणि हिंजवडीपासून अगदी जवळ असून निसर्गाच्या शुद्ध हवेचा लाभ अंबर लेक व्ह्यू येथे घेता येईल. धकाधकीच्या जीवनात कुटूंबाबरोबर थोडासा वेळ घालवता येणे शक्य होईल.

