पुणे- शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणणेकामी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे सुचनेनुसार वाहतुक व्यवस्थापक कार्यालयाकडील परिपत्रकान्वये परिवहन महामंडळाकडील सर्व मार्गावरील बसेसमध्ये बसच्या सिटींग व स्टॅण्डींग क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशी घेणेबाबत कळविण्यात आले होते.
तथापि,पुणे महापालिका आयुक्त यांनी परिवहन महामंडळाकडील सर्व मार्गावरील बसेसमध्ये बसच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के मर्यादित प्रवाशी घेणेबाबत कळविले आहे. त्या अनुषंगाने परिवहन महामंडळाकडील सर्व कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझेशन बाबत नियमांचे पालन करून खालील प्रमाणे खबरदारी घेणे आवश्यक आहे.
१) बसमध्ये बसच्या आसन क्षमतेच्या ५०% प्रवासी घेणे.
२) स्थानकावरील कंट्रोलर कम चेकर सेवकांनी बसमध्ये गर्दी असल्यास प्रवाशांना पुढील बसमध्ये
बसण्याची व्यवस्था करावी.
३) कंट्रोलर कम चेकर सेवकांनी प्रवाशांना बस थांब्यावर सुरक्षित अंतरावर थांबण्याच्या सुचना द्याव्यात.
४) सर्व चालक-वाहक सेवकांनी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे.
५) मास्क शिवाय प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये.
६) बसमध्ये सॅनिटायझरने भरलेली बॉटल सुस्थितीत स्टॅण्डमध्ये ठेवलेली असावी. इतरत्र ठेवण्यात येऊ
नये.
७) प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवणेबाबत मार्गदर्शन करावे.
८) दैनंदिन जास्तीत जास्त बसेस गर्दीच्या वेळेस मार्गावर पाठविण्यात याव्यात.
९) बसेस स्वच्छ धुऊन सॅनिटाईज करण्यात याव्यात.
उपरोक्त प्रमाणे सुचनांचे काटेकोर पालन करून प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवणेबाबत मार्गदर्शन करावे.
पीएमपी च्या बसेसमधून ५० टक्के प्रवासी वाहतुकीला मुभा ..नियम अटी पहा
Date:

