IPL साठी दिल्लीतून आणलेल्या बसेसची तोडफोड, स्थानिकांचा रोजगार हिसकावल्याचा आरोप

Date:

मुंबई-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेकडून आयपीएलच्या बसची तोडफोड करण्यात आली आहे. आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या व्हॉल्वो बसची मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री तोडफोड केली. ताज हॉटेलबाहेर असणारी ही बस मनसे कार्यकर्त्यांनी फोडली आहे. यावेळी त्यांनी बसवर ‘मनसेचा दणका’ असं पोस्टर चिकटवत तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

 दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलबाहेर गोंधळ घालत तोडफोड केली. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या आयपीएल खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी आणलेल्या बसेसवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांनी काठ्या, दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

आयपीएलसाठी महाराष्ट्राबाहेरून कंत्राटी पद्धतीने बस आणल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. यामध्ये स्थानिक लोकांकडे दुर्लक्ष करून बाहेरील राज्यातील लोकांना लाभ मिळत आहे. यावेळी आयपीएलचे सर्व लीग सामने महाराष्ट्रात होणार आहेत. यातील सर्वाधिक सामने मुंबई आणि पुण्यात आहेत.

बसमध्ये घुसून तोडफोड

मिळालेल्या माहितीनुसार, तोडफोड करणारे कामगार मनसेच्या वाहतूक शाखेशी संबंधित आहेत. मध्यरात्री ही तोडफोड झाली. त्यांनी आधी बसमध्ये प्रवेश केला आणि नंतर लाठ्या-काठ्या घेऊन तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या मागण्यांचे पोस्टर लावत घोषणाबाजी करत बसच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी उर्वरित बसेस तोडफोडीपासून वाचवल्या.

विरोध करूनही दिल्लीच्या बसेसला मंजुरी
‘मनसे’चे संजय नाईक यांनी सांगितले की, ‘आमच्या विरोधानंतरही दिल्ली आणि इतर ठिकाणांहून बस आणि छोटी वाहने येथे आणण्यात आली आहेत. ज्यामुळे स्थानिक लोकांच्या जीवनमानावर परिणाम होत आहे. आमचा विरोध आहे, पण आमचे ऐकले जात नाही. यानंतर कामगारांनी हिंसक आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

26 मार्चपासून आयपीएलचा 15वा हंगाम

26 मार्चपासून आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. 29 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. मोसमातील पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलचे सामने मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...

पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे पुण्यामध्ये विशाल स्वच्छता...

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका,घरगुती डिजिटल मीटरचा विरोध,सोलार...