नवव्या ‘चेकमेट 2017’ आंतरराष्ट्रीय
मॅनेजमेंट परिषदेचे उद्घाटन
पुणे :
‘स्पर्धेच्या जगात व्यवसाय वृद्धीसाठी नैसर्गिक व्यूहरचनेपेक्षा क्रांतीकारी व्यूहरचनेची गरज असते’. वर्षानुवर्षे चालत आलेल्या व्यूहरचनांपेक्षा, बाजारपेठ तात्काळ बदलणार्या क्रांतीकारी व्यूहरचनेकडे व्यवसायांनी लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन भारत फोर्जचे संचालक (तंत्र विभाग) मुकुंद मावळणकर यांनी केले.
‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ आयोजित नवव्या ‘चेकमेट 2017’ या आंतरराष्ट्रीय मॅनेजमेंट परिषदेचे उद्घाटन हॉटेल अरोरा टॉवर्स येथे करण्यात आले होते. ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार अध्यक्षस्थानी होते.
उद्घाटन सत्रादरम्यान बीजभाषण देताना मुकुंद मावळणकर यांनी मार्गदर्शन केले.
‘क्रिएटिंग कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजीस् टू लीड पॅराडीम शिफ्ट्स इन
अ डायनॅमिक बिझनेस एन्व्हॉयर्नमेंट’ ही या आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांना मुकुंद मावळणकर यांच्या हस्ते ‘जीवन गौरव’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार, ‘हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट’चे अध्यक्ष मुनव्वर
पीरभॉय,‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ चे संचालक, प्राचार्य डॉ. आर. गणेसन, डॉ. रोशन काझी यावेळी उपस्थित होते.
मुकुंद मावळणकर यावेळी बीजभाषण देताना म्हणाले, ‘प्रत्येक व्यवसायाला वृद्धीसाठी स्वतःच्या नैसर्गिक व्यूहरचना ठरलेली असते. मात्र, आताच्या सतत बदलणार्या वेगवान व्यावसायिक जगतात ही नैसर्गिक व्यूहरचना पुरेशी नसते. बाजारपेठच बदलून टाकणार्या क्रांतीकारी व्यूहरचनेची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे व्यवसायवृद्धीचा वेग वाढतो. नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतात. अशा व्यूहरचना, संकल्पना शोधण्याकडे व्यवसाय-उद्योगांनी लक्ष दिले पाहिजे.’
या परिषदेत नितीन गव्हाणे (थॅसेन्कृप इंडिया प्रा.लि.), जयंत वेलायुधन (मुंबई), वंदना प्रागडा (कॅपगेमिनीच्या सहाय्यक संचालक,मुंबई), संग्राम पवार (पर्सिस्टंट सर्व्हिस लि.), आर. देवराजन (एस एस अॅण्ड सी ग्लोब ऑपचे व्यवस्थापकीय संचालक), इंद्रायणी चक्रबोर्ती (क्रेडीट सुईस), दीपक महाजन (उपाध्यक्ष इलेक्ट्रीकल्स लि. बगला ग्रुप, पुणे), मिलींद काळे (फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स लि.), श्वेता माहेश्वरी (एस एस अॅण्ड सी ग्लोब ऑपच्या सहाय्यक संचालक), अमित आगरवाल, जयकारा शेट्टी, अंजन पाल, डॉ.प्रदीप चॅटर्जी, उदय गुजर, जी. नागराज, संदीप दवे, विवेक नागपोल, झुजर हैदरी, अमोल मौहुलीकर, मेब्स शेख, मोहन साठे हे मान्यवर दोन दिवस सहभागी झाले. व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. रोशन काझी यांनी आभार मानले.