अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी 12 वाजता

Date:

  • गणेशोत्सवाचे १२८ वे वर्ष : इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना.

पुणे : अखिल मंडई मंडळाचा १२८ वा गणेशोत्सव मागील वर्षाप्रमाणे यंदाही साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिरातच शारदा गजानन विराजमान होणार आहेत. गणेश चतुर्थीला शुक्रवार, दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होईल, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

ऑनलाईन पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ६ वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग,सायंपूजा आणि संध्याकाळी ७.३० वाजता महाआरती होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त येतात. त्यामुळे उत्सवकाळात २४ तास ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंडळाच्या https://akhilmandaimandal.org/ या वेबसाईट वरुन शारदा गजाननाचे दर्शन घेता येणार आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अण्णा थोरात म्हणाले, दरवर्षी उत्साहात आणि सर्व जाती धर्मातील आणि मंडईतील कष्टकरी लोकांना सामावून घेऊन अखिल मंडई मंडळाचा गणेशोत्सव साजरा होत असतो. १२८ वर्षाच्या इतिहासात दुसऱ्यांदा मंदिरातच गणेशोत्सव साजरा होणार आहे. परंतु पुढील वर्षाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी यंदा सगळ्यांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे अधिक काळजी घेण्यात येणार आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी, अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मंडळाच्या वतीने लसीकरण मोहिम देखील राबविण्यात येत आहे. यासोबतच कमीत कमी गणेशभक्त मंदिरात असतील. यासोबतच प्रत्येक २ तासांनी फॉग मशीनच्या सहाय्याने पूर्ण मंदिर सॅनिटाईज केले जाणार आहे. त्याशिवाय आॅकिसमीटर, आणि थर्मामीटरच्या सहाय्याने प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे. मंडळात येणाºया प्रत्येकासाठी मास्क बंधनकारक आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लाडक्या बहिणींनो बँक खाते चेक करा!:जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी...