‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’च्या (एकेईसी) वर्ष २०१० च्या बॅचने रशियातील ‘कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी’मध्ये १०० टक्के निकालासह उत्तीर्ण होण्याची अभिमानास्पद कामगिरी करुन दाखवली आहे. ‘एकेईसी’तर्फे गेलेल्या या तुकडीतील सर्व म्हणजे ७४ विद्यार्थ्यांनी त्यांची अंतिम वर्षातील परीक्षा उत्तम गुणांसह पूर्ण केली आहे. या तुकडीचा पदवीदान समारंभ गेल्या २४ जून रोजी ‘कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी’मध्ये झाला. युनिव्हर्सिटीच्या डीन फॉर इंटरनॅशनल अफेअर्स डॉ. इलिना कोश्पिव्हा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. ‘एकेईसी’चे संचालक डॉ. अमित कामले कझान युनिव्हर्सिटीतील भारतीय विद्यार्थी समुदायाला करत असलेल्या साह्याबाबत डॉ. कोश्पिव्हा यांनी आभार मानले आणि पदवीधर विद्यार्थ्यांना यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. पुण्याचा अभिलाष जोशी व नागपूरचा राहुल राहाते या विद्यार्थ्यांना रेड डिग्री मिळाली. या तुकडीत पुण्यातील गणेश झुरळे व सुमय्या चिकटे याही यशस्वी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
डॉ. अमित कामले यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व डॉक्टरांना आयुष्यात सदैव यश मिळण्यासाठी शुभेच्छा देऊन या विद्यार्थ्यांच्या पालकांचेही अभिनंदन केले. हे पदवीधर आणि पालक अत्यंत आनंदात होते. डॉ. अमित कामले यांच्या मदत आणि मार्गदर्शनामुळे हे विद्यार्थी डॉक्टर बनल्याने पालकांनी डॉ. कामले यांचे आभार मानले. ज्या पालकांनी पदवीदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी कझानला भेट दिली त्यांनीही प्रवासाच्या आरामदायी सुविधेबद्दल डॉ. कामले यांना धन्यवाद दिले.

