पुणे -३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंटम’ संपन्न झाली. पुण्यातील येरवडा
येथील ‘पुणे गोल्फ कोर्स’ येथे झालेल्या या स्पर्धेस सकाळी ६.३० वाजता सुरुवात झाली. या स्पर्धा स्टेबल फोर्ड कॅटेगरी
हँडीकॅप असा प्रकारात गोल्ड, सिल्वर आणि ब्राँझ डिवीजनमध्ये आयोजित केले होत्या. या स्पर्धेत १३५ स्पर्धकांनी भाग
घेतला होता. यामध्ये पुणे व परीसरातील विविध कंपन्यांचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि काही परदेशी पाहुणे देखील
सहभागी होते. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाली. जयदीप पटवर्धन
आणि ललित चिंचाळकर यांनी याचे आयोजन केले होते. याप्रसंगी मीरा कलमाडी, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष
कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत, क्रीडा समन्वयक प्रसन्न गोखले उपस्थित होते.
ललित चिंचाळकर, अमित सावंत आणि कुलभूषण सिंह यांनी विशेष सहकार्य केले. या स्पर्धेचे स्वागत प्रास्ताविक व
आभार प्रदर्शन पुणे फेस्टिव्हल क्रीडा समन्वयक प्रसन्ना गोखले यांनी केले.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
१. गोल्ड विभाग – स्ट्रोक प्ले कॅटेगरी
प्रथम क्रमांक – आकाश नखारे (७० गुण)
पहिला रनरप – मोहित नखारे (७० गुण)
दुसरा रनरप – अनन्या गर्ग (७१ गुण)
२. सिल्व्हर विभाग – स्टेबल फोर्ड कॅटेगरी
प्रथम क्रमांक – सलढाना (३९ गुण)
पहिला रनरप – दलजित अरोरा (३८ गुण)
दुसरा रनरप – लिओन झॅकरिअस (३८ गुण)
३. ब्राँझ विभाग – स्टेबल फोर्ड कॅटेगरी
प्रथम क्रमांक – रिशी भोसले (४५ गुण)
पहिला रनरप – अमित कोठारी (४४ गुण)
दुसरा रनरप – आशिष वर्मा (४३ गुण)
४. ओवरऑल बेस्ट जूनिअर – अनन्या गर्ग (३६ गुण)