पुणे- लक्ष्मण जगताप यांना शहरातील विकासासाठी मोठ्ठी पदे देवून त्यांना ताकद पुरवून आपण त्यांच्या गैरधंद्यांकडे दुर्लक्ष केल्याची जाहीर अप्रत्यक्ष कबुली आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली तरीही या संधीसाधुने दिलेली फुलचड्डी टाकून सत्तेसाठी हाफ चड्डी घातली खाल्ल्या मिठाला जागला नाही अशी जोरदार टीका जगताप यांचे नाव न घेता केली
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे गुरुवारी भूमिपूजन व उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर लक्ष्मण जगताप यांच्या सांगवीत आयोजित केलेल्या सभेत अजितदादांनी त्यांच्यावरच हल्लाबोल केला.
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास व्हावा म्हणून काही लोकांना पुढे आणले व शहराच्या विकासासाठी अशांना वेळोवेळी मोठमोठी पदे, ताकद दिली. त्यामुळे यांच्या काही चुकीच्या कामांकडेही दुर्लक्ष केले. टीडीआर, जमिनी, बांधकाम व्यावसायाकडे दुर्लक्ष केले. मात्र, हे लोक संधीसाधू होते मी अनेकांना पदे दिली. महापौरपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद अगदी आमदारकीही देत फुल चड्डी घालायली दिली. मात्र, अलीकडे हे हाफ चड्डीवर फिरताहेत अशी टीका अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे अध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर केली आहे. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा व खाल्या मीठाला जागा. यांच्याविषयी फार न बोलललेच बरं अशी टिप्पणी करीत अजितदादांनी आपला त्रागा व्यक्त केला.

लक्ष्मण जगतापांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपशी घरोबा केल्याने संतापलेल्या अजितदादांनी सांगितले की, सत्ता गेली म्हणून माणसाचे पक्ष बदलू नये. थोडा मागचा पुढचा विचार केला पाहिजे. सत्ता, पदं फार काळ टिकत नाही ती येतात अन् जातात पण तोडलेला विश्वास परत कधीच येत नाही असे सांगत जगतापांवर शरसंधान साधले.
अजित पवारांनी यावेळी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.ते म्हणाले ,’सध्याच्या सरकारची धोरणे ही खरंच चिंताजनक असल्याचे मला वाटते. ज्यांच्याकडे देशाची सूत्रे आहेत ते देशाचे पंतप्रधान देशात कमी आणि परदेशातच जास्त असतात. फक्त आपला उदो-उदो करण्यासाठी त्यांनी केंद्राच्या तिजोरीतून साडे आठशे कोटी रुपये उधळले. इथल्या सामान्य नागरिकाला तो अकडा लिही म्हटले, तरी नीट लिहता येणार नाही. एवढा पैसा त्यांनी फक्त प्रसिद्धीवर उधळला. आजकाल पेपरच्या पानांवर फक्त त्यांचाच फोटो दिसतो, तसा आदेशच त्यांनी काढला आहे. ‘अच्छे दिन’ आणणार होते, काळा पैसा देशात परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार होते. मात्र आज दीड वर्ष झाली, ना पैसा आला, ना अच्छे दिन आले.इंदिरा गांधी, राजीव गांधी, जवाहरलाल नेहरू यांची छायाचित्रे आता सार्वजनिक ठिकाणी लावू नका, त्यांची नावे योजनांनाला देऊ नका अशी भूमिका सरकार घेत आहे. त्यांनीही देशाच्या जडण-घडणीला हातभार लावला आहे. असे असताना सरकार त्यांचा एवढा दुःस्वास का करत आहे?हे लोक राम मंदिर बांधू म्हणून मतांचे राजकारण करत आहेत. आम्हीही मंदिरे बांधतो मात्र त्यात राजकारण करत नाही व्यापारी व उद्योगाकडेच सर्व लक्ष असणाऱ्या सरकारचे शेतकरी व बहुजनांकडे लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्याही भाजप सरकारच्या काळात वाढल्या आहेत. यांच्या राज्यात पिण्याचे पाणी २० रूपये मात्र दुधाचा भाव १८ रुपये असतो. दुष्काळी परिस्थितीत दुधाचे भाव घसरतात. अशा वेळी शेतकऱ्यांनी खायचे काय? पिझ्झा!