Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अजितदादा तुम्ही तरी….जाचक निर्बंधांमधून पुणेकरांची सुटका करा-सभागृहनेते गणेश बिडकरांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र -प्रस्ताव

Date:

पुणे-राज्य सरकारने करोनाचे निर्बंध कायम ठेवल्याने शहरातील व्यापारी वर्ग हैराण झाला असून सर्वसामान्य नागरिकांचा देखील संयम सुटत चालला आहे. हे निर्बंध आता असेच ठेवून पुणेकरांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, अशी विनंती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना केली आहे.
करोना संकटाचा सर्वाधिक फटका पुण्याला बसलेला आहे. करोनावर मात करण्यासाठी दीड वर्षापासून राज्य सरकारने घातलेल्या सर्व नियमांचे पालन शहरातील नागरिकांनी केलेले आहे. याचा परिणाम म्हणून पुणे आता या आजाराच्या मगरमिठीतून मोकळा श्वास घेऊ लागले आहे. सद्यस्थितीत शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या अडीच हजाराच्या खाली असून पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्क्यांच्या खाली आहे. शहरात रुग्णसंख्या वाढली, तर त्यावर आवश्यक ते उपाय करण्यासाठी आरोग्य व्यवस्था देखील सज्ज आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकार या निर्बंधातून पुणेकरांची सुटका का करत नाही? असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे, असे सभागृह नेते बिडकर यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
करोनामुळे छोट्या-मोठ्या कंपन्यांतील आर्थिक व्यवहार थंडावलेले आहेत. हॉटेल व्यवसाय डबघाईस आला असून मोठे मॉल्स कायमचे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे शहरातील व्यापारी वर्ग अक्षरशः हवालदिल झालेला आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सर्वच घटकांना दिलासा देण्यासाठी निर्बंध उठविण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. निर्बंध कमी झाल्यानंतर आवश्यक ती खरबदारी घेत सर्व नागरिक जबाबदारीने वर्तन करतील यावर विश्वास ठेवायला हवा. धाडसी स्वभाव हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, त्यानुसार कृती करून आपण या जाचक निर्बंधांमधून पुणेकरांची सुटका करा, अशी मागणी बिडकर यांनी केली आहे.


करोनामुळे अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे गेलेल्या पुणेकरांना जबाबदार वर्तन कसे असायला हवे, हे सांगण्याची गरज नाही. निर्बंध हटवून त्यांचे आर्थिक व्यवहार सुरळीत होतील यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याची गरज आहे.

  • गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सदाशिव पेठेत रमेश डाईंग येथे टेरेसवर आग:परिसरात धुराचे साम्राज्य: वाहतुकीचा बट्ट्याबोळ

अग्निशमन दलाकडून चार अग्निशमन वाहने दाखल. आग विझवण्याचे काम...

शांतता पुणेकर वाचत आहेत मध्ये उद्यम विकास सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

नागरिकांनी रोज रात्री झोपताना काहीतरी वाचण्याची सवय लावावी -...

महाराष्ट्रात थंडी वाढणार,पुढील 48 तास धोक्याचे

मुंबई- महाराष्ट्रात मुंबईसह उपनगरात गारठा वाढू लागला आहे. दुसरीकडे,...

राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे (CPA) ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचा भव्य शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; विद्यार्थ्यांना राष्ट्रीय...