अजित पवारांनी राज्य पुण्यातून चालवावे अन्यथा पालकमंत्री तरी बदलावा – आ.चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

Date:

पुणे-अजित पवारांनी राज्य पुण्यातून चालवावे नाहीतर पुण्याला पालकमंत्री वेगळा द्यावा ,अजित पवार यांच्या कार्याच्या क्षमतेचे कौतुक करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी हे आवाहन उपमुख्यमंत्री पवारांना केले. एवढेच नव्हे तर एकूणच कोरोना संदर्भात शरद पवार यांचे मार्गदर्शनहि मोलाचे ठरू शकते असेही ते म्हणाले. अजित पवार दिवसभर नेटवर्क बाहेर असल्याचा आरोप कात्रज येथे आ.पाटील यांनी केल्यावर अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत.’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी त्यास उत्तर दिले होते, त्यावर आज पत्रकारांनी आ.पाटील यांना विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले.

आज शुक्रवारी ( दि. २३) चंद्रकांत पाटील यांचा हस्ते कोविड केअर सेंटर चे उदघाटन झाले. एसएनडीटी कॉलेज मध्ये हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. १०० बेड चे हे केंद्र विलगीकरणासाठी उपयोगी ठरणार आहे. या उद्घाटनानंतर पाटील बोलत होते.

अजित पवारांचा वक्तव्याबाबत पाटील म्हणाले ” देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणीही काहीही बोलू शकते. पण मी चॅलेंज केले होते की, अजित पवारांना फोन लावून द्या, कारण ते गायबच होते. २४ तास ते कोणालाच उपलब्ध झाले नव्हते. अजित पवारांच्या कार्यक्षमतेबद्दल माझा मनात शंका नाही. पण वाढत असलेला कामाचा व्याप पाहता मला असा वाटतं की, त्यांनी एकतर पुण्यातून किंवा मुंबईतून कारभार चालवावा. आणि पुण्याला वेगळा पालकमंत्री द्यावा. पण एकूण गरज लक्षात घेता त्यांनी पुण्यातून कारभार चालवायला पाहिजे आणि पुण्यात सहज उपलब्ध व्हायला हवे. लोकांना आता दिलासा हवा आहे.”

दरम्यान. रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत राजेश टोपे यांनी केलेल्या दाव्याबद्दल पाटील म्हणाले ” ग्लास अर्धा भरला आहे असाही म्हणता येतं किंवा रिकामा आहे असेही म्हणता येतं. महाराष्ट्र सरकारने त्यांचं अपयश लपवण्यासाठी सारखे केंद्राकडे जायचे ठरवलंय. नाहीतर तो चार्ट पहिला तर सगळ्यात जास्त इंजेक्शसन ही महाराष्ट्राला मिळाली आहेत. १० दिवसांसाठी.तब्बल २ लाख ६९ हजार इंजेक्शन्स दिली आहेत. ज्या गुजरातच्या नावाने आरडाओरडा होतो त्यांना पण १ लाख ४० हजार मिळाली आहेत.

रेमडेसिवीर मिळत नसल्याचा दावा करत पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आपण एक कोटी रुपये घेऊन अजित पवारांच्या टेबलवर ठेवा असं सांगितल्याचे ही पाटील म्हणाले. ” मी एक घोषणा करतो. महापालिका आणि सरकार ला अ‍ॅडव्हान्स पैसे देता येत नाहीत. तर जो डिस्ट्रिब्युटर अ‍ॅडव्हान्स पैसे मागेल त्याला भीक मागून पैसे गोळा करून मी देइल . त्यांचे मिळाले की मला परत द्यायचे. मी मागितले की भीक जास्त मिळते. १०० कोटींचे इंजेक्शन घेऊ. संपूर्ण महाराष्ट्रात मी अ‍ॅडव्हान्स द्यायला तयार आहे”

पत्रकारांनी त्यांना ‘सीरम महाराष्ट्रात आहे आणि पुनावाला कुटुंबाकडे त्याचा कारभार आहे तर.’ असं विचारलं असता, “मी एवढंच पुनावाला यांना आवाहन करु शकतो की त्यांनी महाराष्ट्राला प्राधान्य दिलं पाहिजे,” अशी प्रतिक्रिया दिली.

पुण्यामधील रुग्णालयांच्या बेड्सची संख्या वाढवण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं. आम्ही पुण्यातील प्रत्येक भाजपा नगरसेवकांना त्यांच्या त्यांच्या प्रभागातील एखाद्या कोव्हिड सेंटरमध्ये जमेल तेवढ्या बेड्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यास सांगितलं आहे. आम्ही या केंद्रांना बेड्स आणि इतर सुविधा देऊ. करोना काळानंतर त्या गोष्टी पक्षाकडून रुग्णालयांना भेट म्हणून कायम स्वरुपी वापरण्यासाठी देण्यात येतील, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. अशाप्रकारे गुरुवारी आपण पुण्यात तीन रुग्णालयांमधील नवीन बेड्सच्या कक्षांचं उद्घाटन केल्याचं पाटील म्हणाले. नगरसेवक असणाऱ्या लायगुडे यांनी ४५ बेड्स, मनिषा कदम यांनी ३० बेड्स, मंजुषा नागपुरे यांनी २५ बेड्सची सुविधा उपलब्ध करुन दिलीय. मी संजीवनमध्ये ४० बेड्स देणार असल्याचं कळल्याने त्यांनी स्वत:हून ३० बेड्स वाढवल्याने तिथे आता ११० बेड्सची सुविधा उपलब्ध आहे, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...