पुणे- नगरसेवक अजित दरेकर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांच्या सत्काराचा सोहळा येथे संपन्न झाला . यातील श्रीधर फडके यांची भक्तीगिते सादरीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला .कार्यक्रमाची सुरूवात स्वामींचा भंडारा ने झाली नगरसेविका आरती कोंढरे व विजया हरीहर ,सुशिला नेटके आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली .त्यानंतरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंञी बाळासाहेब शिवरकर, बाळासाहेब दाभेकर,सहपोलिस निरीक्षक वैभव पवार,
तसेच काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा सौ.कमल व्यवहारे,नगरसेवक रघुनाथ गौडा आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर राहुल साठे प्रस्तुत भव्य शो
“नृत्यविष्कार २०१८”या कार्यक्रमास प्रारंभ झाला
या कार्यक्रमाची सांगता प्रमुख पाहुणे आमदार अनंतराव गाडगीळ,
माजी गृहराज्यमंञी रमेश बागवे, अभय छाजेड,तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या उपस्थितीत झाली .यावेळी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टच्या वतीने दिशा परिवारचे संस्थापक अध्यक्ष श्री राजाभाऊ चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला .




