देशाच्या ‘हॉटस्पॉट’ वर लढलेला महायोद्धा म्हणजे अजितदादा – खा. अमोल कोल्हे

Date:

पुणे – जागतिक महामारीच्या काळात आपल्या देशाच्या ‘हॉटस्पॉट ‘वर लढलेला महायोद्धा अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कामाचे कौतुक करत अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी हि कोरोना काळात केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करून कदम यांनी अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुरु केलेल्या लोकोपयोगी उपक्रमाचे उद्घाटन केले . यावेळी त्यांनी अजितदादा यांना लोकांच्या मनातले मुख्यमंत्री असे संबोधित आगामी महापालिकेच्या निवडणूक संग्रामात आपणही महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारू असेही सूचित केले. 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा चे औचित्य साधून नगरसेविका अश्विनी कदम आणि पर्वती विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितीन कदम यांनी आपल्या थेट जनसंपर्क आभियांच्या अंतर्गत सर्व शासकीय दाखले नागरिकांना मोफत देण्याचा उपक्रम सुरु केला त्याचे  उद्घाटन आणि कदम दाम्पत्यांच्या महा इ सेवा केंद्राचे उद्घाटन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले .
यावेळी  तहसीलदार तृप्ती कोलते पाटील आणि राष्ट्रवादी चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .नगरसेविका अश्विनी कदम यांनी यावेळी आपल्या मतदारसंघातील कामाचा आढावा घेतला .उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळे आपण कोरोना काळात देखील लोकोपयोगी सेवा देऊ शकल्याचे सांगितले.यावेळी पर्वती विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी चे अध्यक्ष नितीन कदम म्हणाले कि,’ अनेक नागरिकांना वेळोवेळी विविध शासकीय दाखल्यांची गरज लागते आणि वेळेवर मग त्यांची तारांबळ उडते काही समाज कंटक त्यांच्या वेळेचा फायदाही घेतात , नागरिकांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने कधी कधी फसगत हि होते हे होऊ नये म्हणून जेव्हा नागरिकांना गरज असेल तेव्हा त्या त्या शासकीय दाखल्यांसाठी नागरिक येथे येऊ शकतात आणि मोफत त्यांना त्यांचे दाखले काढून देण्याचे काम येथून केले जाईल . महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जाणार आहेत. सर्वसामान्य नागरिक आवश्यक असणाऱ्या सेवांचा अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरून आवश्यक व उपलब्ध त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करू शकणार आहेत. यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाबाबतीत मानसिक समाधानव वेळेची बचत होऊन दिलासा प्राप्त होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...