एअरएशिया इंडियाने कोलकाता, भुबनेश्वर आणि पुणे या शहरांच्या दरम्यान विमानसेवा सुरु केल्या

Date:

मंदिरांची नगरी भुबनेश्वर आणि पुण्य नगरी पुणे यांच्या दरम्यान थेट सेवा सुरु करणारी एकमेव एअरलाईन

पुणे-:  भारतीय आकाशांमध्ये सर्वोत्तम ऑन-टाईम परफॉर्मन्स (साधी सरासरी डीजीसीए २०२० अहवालानुसार) नोंदवत २०२० ला निरोप दिल्यानंतर एअरएशिया इंडियाने कोलकाता, भुबनेश्वर आणि पुणे या शहरांना जोडणाऱ्या नव्या विमानसेवा सुरु करत नव्या वर्षात दमदार पदार्पण केले आहे.  अशाप्रकारे भुबनेश्वर आणि पुणे शहरांच्या दरम्यान थेट / विना-थांबा विमानसेवा देणारी एकमेव एअरलाईन  बनल्यामुळे एअर एशिया इंडियाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.  या सेक्टर्ससाठी तिकिटांची विक्री सुरु झाली असून विमानसेवा २४ जानेवारी २०२१ पासून सुरु होत आहेत.

विमाने २४ जानेवारी २०२१ पासून सुरु होत आहेत: 

विमान क्रमांकपासूनपर्यंतवारंवारता (आठवड्यातून सहा दिवस)
I5 911कोलकाताभुबनेश्वरसोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार
I5 911भुबनेश्वरपुणेसोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार
I5 912पुणेभुबनेश्वरसोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार
I5 912भुबनेश्वरकोलकातासोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार

एअरएशिया इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. अंकुर गर्ग यांनी सांगितले, “कोलकाताभुबनेश्वर आणि पुणे या शहरांना जोडणाऱ्या नव्या विमानसेवा सुरु करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  कोलकाता आणि पुणे यांना जोडणाऱ्या आमच्या फ्लाय-थ्रू सेवेमार्फत विमानसेवा अधिक जास्त सुविधाजनक करण्याच्या दृष्टीने या फ्लाईट्स ठरवण्यात आल्या आहेत. १ ऑगस्ट २०१७ रोजी एअरएशिया इंडियाने भुबनेश्वरहून कामकाजाला सुरुवात केली आणि आता बंगलोरमुंबईनवी दिल्ली व कोलकाता या आमच्या चार मुख्य केंद्रांना भुबनेश्वर जोडले गेले आहे.  लॉकडाउनच्या काळात लोकांना आपल्या घरी सुरक्षित पोहोचता यावे यासाठी सुरु करण्यात आलेल्या उम्मीद की उडान या आमच्या उपक्रमांतर्गत कोचीमुंबईइंफाळगुवाहाटीबागडोगराजम्मू आणि पोर्ट ब्लेअर यांच्यासह देशभरातील विविध शहरांमधून ओडिशापर्यंत सेवा उपलब्ध करवून देऊन राज्य सरकारे आणि इतरांसोबत काम करत आम्ही आमचे संबंध अधिक दृढ केले आहेत.”

प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत या एअरलाईनने २०२० मध्ये १८६ आसनी एअरबस ए३२० निओ ही तीन विमाने आपल्या ताफ्यात दाखल केली.  सुरक्षित प्रवासाची सेवा वृद्धिंगत करण्यासाठी वैविध्यपूर्ण सेवा आणणाऱ्या एअरएशिया इंडियाने नुकतीच                   एक्सट्रा सीट ही नवी सेवा सुरु केली.  यामध्ये प्रवाशांना एक अतिरिक्त सीट रिझर्व्ह करता येते व सुरळीत व आरामदायी विमान प्रवासाचा अनुभव घेता येतो.  ही सेवा एअरएशिया इंडियामार्फत संचालित केल्या जाणाऱ्या सर्व विमानांमध्ये घेता येते आणि ज्यांना विमानात बसताना काही विशेष गरजा असतात किंवा ज्यांना आपल्यासोबत काही नाजूक, वैयक्तिक गोष्टी न्यायच्या असतील किंवा ‘स्वतःचा’ खास वेळ हवा असेल अशा प्रवाशांसाठी ही सेवा अगदी योग्य आहे.  लहान बाळासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींना ‘एक्स्ट्रा सीट’ बुक करून त्यावर कॅरी कॉट ठेवता येईल आणि स्वतःसाठी, बाळासाठी विमानप्रवास अधिक जास्त सुखकर बनवता येईल. एअरएशिया इंडियाने एविस कार रेंटल सर्विसेससोबत देखील सहयोग केला आहे.  एविसच्या मध्यम, प्रीमियम, लक्झरी आणि एसयुव्ही गाड्यांच्या ताफ्यामधून एअरपोर्ट ट्रान्सफर्स, शोफर सेवेसहित वाहने, दीर्घकालीन कार रेंटल्स किंवा स्वतः चालवून नेण्यासाठी कार अशा सेवा प्रवाशांना सहज मिळवता येतील.

बंगलोर, नवी दिल्ली आणि मुंबई यांच्या बरोबरीनेच कोलकाता हे देखील एअरएशिया इंडियाचे एक प्रमुख केंद्र आहे.  किफायतशीर प्रवास सेवा उपलब्ध करवून देण्याचे उद्धिष्ट असलेल्या या एअरलाईनने देशभरातील आपल्या नेटवर्कला अधिक जास्त मजबूत करण्यासाठी कितीतरी नवे रूट्स नुकतेच सुरु केले आहेत.  सध्या एअरएशिया इंडियामध्ये कोलकाता शहराला बंगलोर, मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद, इंफाळ, बागडोगरा, भुबनेश्वर आणि चेन्नई या शहरांसोबत जोडणाऱ्या विमानसेवा उपलब्ध आहेत.  त्याचप्रमाणे भुबनेश्वर आणि बंगलोर, नवी दिल्ली, मुंबई व पुणे यांना जोडणाऱ्या आणि पुणे शहराला जयपूर, नवी दिल्ली, भुबनेश्वर व बंगलोर यांना जोडणाऱ्या विमानसेवा देखील ही एअरलाईन चालवते.  पुणे – जयपूर विमानसेवा ही एअरएशिया इंडियाची आणखी एक अनोखी सेवा आहे, या हवाईमार्गावर सेवा देणारी ही एकमेव एअरलाईन आहे.

एअरएशिया इंडिया

बंगलोर येथे मुख्यालय असलेली एअरएशिया (इंडिया) लिमिटेड ही टाटा सन्स लिमिटेड व एअरएशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेडसहित एअरएशिया यांच्या संयुक्त भागीदारीतील कंपनी आहे.  एअरएशिया इंडियाची सुरुवात १२ जून२०१४ रोजी झाली.  सध्या त्यांच्या ताफ्यात ३३ ए३२० विमाने असून भारतातील १९ ठिकाणी त्यांच्या सेवा पुरवल्या जातात.  फॉर एव्हरीवन‘ (‘प्रत्येकासाठी‘) हे ब्रँड घोषवाक्य असलेली ही एअरलाईन आपल्या प्रवाशांना आरामदायी लेदर सीट्सवैविध्यपूर्ण निवडीला वाव असलेले गरमागरम जेवणखास लॉयल्टी मेंबर बेनिफिट्स असे अनेक लाभ देते.  स्वप्ने पाहण्याची हिम्मत ठेवाप्रवाशांना सेवा पुरवण्यासाठी तत्पर राहालोकांचा विचार सर्वात आधीकायम सुरक्षितता बाळगाप्रत्यक्षात करून दाखवावन एअरएशिया आणि शाश्वतता या मूलभूत मूल्यांच्या आधारे एअरएशिया भक्कम उभी आहे. 

संचालनात्मक कार्यक्षमता आणि प्रवाशांना प्रदान केला जाणारा अनुभव यामध्ये वाढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या या एअरलाईनने एक मल्टीट्युड सुरु केले असून यामध्ये डिजियात्रा बायोमेट्रिक आणि बंगलोरमधील त्यांच्या केंद्रापासून संपर्करहित प्रवास अनुभवबंगलोरनवी दिल्ली आणि हैदराबादमध्ये एअरएशिया फ्लायपोर्टर डोअर टू डोअर बॅगेज डिलिव्हरी सेवारेड कार्पेट प्रायॉरीटी चेक-इनबोर्डिंग आणि बॅगेज सेवा व एव्हीए (एअरएशिया व्हर्च्युअल ऑलस्टार) हे व्हाट्सअप व airasia.com वर उपलब्ध असलेले बहुभाषिक चॅटबॉट या सुविधा आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...