नवी दिल्ली, 1 मार्च 2022
एअर मार्शल श्रीकुमार प्रभाकरन यांनी आज दिनांक 01 मार्च 2022 रोजी दिल्ली स्थित पश्चिम हवाई कमांड (WAC) ची सूत्रे स्वीकारली.
Y1YH.jpeg)
एअर मार्शल श्रीकुमार प्रभाकरन हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे येथील पदवीधर आहेत आणि त्यांना 22 डिसेंबर 1983 रोजी भारतीय हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्त करण्यात आले. ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (DSSC) वेलिंग्टन आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज, नवी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. अनुभवी मिग-21 पायलट आणि श्रेणी ‘A’ पात्र उड्डाण प्रशिक्षक असलेल्या एअर मार्शल एस.प्रभाकरन यांना जवळपास 5000 तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे.
5DK4.jpeg)
आपल्या 38 वर्षांच्या सेवा कारकिर्दीत, एअर मार्शल श्रीकुमार प्रभाकरन यांनी महत्त्वाच्या कमांड आणि अधिकारीक पदांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. सध्याच्या नियुक्ती आधी ते हैदराबाद येथील एअर फोर्स अकादमी, येथे कमांडंट पदावर होते.
हवाई अधिकारी श्री.श्रीकुमार प्रभाकरन हे हवाई दल पदक आणि अति विशिष्ट सेवा पदक प्राप्त केलेले मानकरी आहेत.
एअर मार्शल अमित देव हे 28 फेब्रुवारी 2022 रोजी भारतीय वायुसेनेतून 39 वर्षांहून अधिक वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले, त्यानंतर एअर मार्शल एस प्रभाकरन,या पदावर रुजू झाले आहेत.

