‘आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज’च्या विद्यार्थिंनीना राज्यस्तरीय ‘मोन्टेक्स बॉल क्रिकेट’स्पर्धेत विजेतेपद
पुणे :
राज्य पातळीवरील मोन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी विजेतेपद पटकाविले.
‘महाराष्ट्र स्टेट मोन्टेक्स बॉल क्रिकेट असोसिएन’च्या वतीने घेण्यात आलेली ही पाचवी राज्य स्तरीय स्पर्धा सिंहगड कॅम्पस, कमलापूर सांगोला पार पडली.
विजेत्या संघाचे ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार, गफार सय्यद (आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज फॉर गर्ल्सचे उपप्राचार्य), गुलजार शेख (आझम स्पोर्टस् अकॅडमीचे संचालक) यांनी अभिनंदन केले.