पुणे, ता. ४ – अभिनेत्री सविता मालपेकर यांनी विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी अहिल्यादेवी शाळेत हजेरी लावली आणि प्रदीर्घ काळानंतर शाळेत येणार्या मुलींना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
मालपेकर म्हणाल्या, ‘कोरोना काळात आपण खूप काही गमावलं. कोरोनाने आपली जवळची माणसे हिरावून घेतली. परंतु आपण सार्या जणी त्यावर मात करीत नव्या जोमाने शाळेत आलात. आपला हा उत्साह पाहून मला माझी शाळा आणि बालपण आठवले. शासकीय नियमांचे पालन करीत आपण पुन्हा लॉकडाउन लागणार नाही याची काळजी घेऊ.’
अभिनेत्री श्र्वेता अंबीकर यांनीही विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन दिले. विद्या म्हात्रे यांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासंबंधी मार्गदर्शन केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सह-कार्यवाह प्राजक्ता प्रधान प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका अनघा डांगे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. पल्नवी पारुंडेकर यांनी सूत्रसंचालन, उपमुख्याध्यापिका स्वाती मिश्रा यांनी आभार प्रदर्शन आणि मानसी देशपांडे यांनी सरस्वती वंदना सादर केली. पर्यवेक्षिका चारुता प्रभुदेसार्इ आणि स्मिता राजगुरु यांची प्रमुख उपस्थिती होती.

