Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात येणारे महत्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करुन नागरिकांनी काळजी घ्यावी-उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

● शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य
● ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत 3 लाख 30 हजार 674 नमुना तपासणी पूर्ण
● मागील आठवड्याचा बाधित रुग्णसंख्येचा दर 3.1 टक्के पर्यंत कमी
● ऑक्सिजन प्रणाली व पीएसए प्लांट बाबत संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण
● सप्टेंबरमध्ये जास्तीत जास्त लसीकरणावर भर
● तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनीही नियमांचे पालन करावे

पुणे, दि. 27 : राज्यातील निर्बंध कमी केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील काळात येणारे दहीहंडी, गणेशोत्सव व अन्य सर्व धर्मियांचे महत्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

पुणे विधान भवनाच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील कांबळे, आमदार राहुल कुल, आमदार चेतन तुपे, आमदार संजय जगताप, आमदार भिमराव तापकीर तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पीएमआरडीएचे व्यवस्थपकीय संचालक सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मागील आठवड्यात पुणे जिल्ह्याचा बाधित रुग्ण संख्येचा दर 3.1 टक्के पर्यंत कमी झाला आहे त्यामध्ये पुणे मनपा 2.8 टक्के, पिंपरी चिंचवड मनपा चा 2.9 टक्के व पुणे ग्रामीण चा 3.6 टक्के होता. पुणे ग्रामीणमध्ये धडक सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत 3 लाख 30 हजार 674 नमुना तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. ऑक्सिजन प्रणाली व पीएसए प्लॅन्टबाबत संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांकरीता ऑक्सिजन विरहीत बेड्स, ऑक्सिजन बेड्स, आय सी यु बेड्स, व्हेंटीलेटर्स आदींचे नियोजन करण्यात आले आहे.

तिसरी लाट येण्यापूर्वी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. प्रशासनाने जिल्ह्यात नियमाप्रमाणेच लसीचे वाटप करावे. उद्योग क्षेत्रासह अन्य क्षेत्रांकडूनही जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्यात येत आहे. पुढील महिन्यात जास्त लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशेष गटातील औद्योगीक क्षेत्र, दिव्यांग, परदेशी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, गरोदर माता, बेड रिडन नागरिक, तृतीय पंथी आदींचे लसीकरण सुरु आहे. तसेच शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांपैकी 0.16 टक्के इतके नागरिक कोरोनाबाधीत आढळून आले आहेत त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता जास्तीत जास्त काळजी घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, खासदार वंदना चव्हाण, तसेच अन्य लोकप्रतिनिधींनीही महत्त्वाच्या सूचना केल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर, प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर, तिसऱ्या लाटेच्या तयारीच्या दृष्टीने ऑक्सिजन प्लांटची सद्यस्थिती बाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...