पुणे – भाजपा शहर सरचिटणीसपदी प्रदीप उर्फ सागर अफुवाले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी नुकतेच दिले.काही दिवसापूर्वीच त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

अफुवाले यांनी कोरोन काळात उल्लेखनीय कार्य केले आहे. शेठ ताराचंद हॉस्पिटल मधील रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर,नर्स यांना सॅनिटायझर,हॅन्ड ग्लोज मास्क व पी.पी.ई कीट वाटप.नागरिकांना रुग्णालयात बेड मिळवून देणे,प्लाज्मा उपलब्ध करून देणे,आरोग्य शिबिराचे आयोजन,वस्ती भागातील नागरिकांसाठी धान्य कीट वाटप, अन्नदान आदी उपक्रम त्यांनी राबविले आहेत.त्याचीच दखल घेत पक्षाने त्यांची पुणे शहर सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीने पुणे कॅन्टोनमेंट मतदार संघात पक्षाचे बळ वाढणार आहे. आमदार सुनील कांबळे व सभागृहनेते गणेश बिडकर यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

