निलंबन केल्यानंतर जयंत पाटील ट्वीट करत म्हणाले “विधानसभा अध्यक्षांना उद्देशून बोलल्याचा हा तर बनाव’

Date:

नागपूर -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांचं निलंबन असणार आहे. यानंतर जयंत पाटील यांनी ट्वीट केलं असून ‘असा निर्लज्जपणा करू नका’ असे शिंदे फडणवीस सरकारला उद्देशून म्हणालो मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याच्या व वचक बसवण्याच्या उद्देशाने सरकारने मी असे विधानसभा अध्यक्षांना उद्देशून बोलल्याचा बनाव केला व मला हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे, असे म्हटले आहे.

या शिवाय जयंत पाटील यांनी केलेय आणखी एका ट्वीट मध्ये सरकारवर ताशेरे ओढले आहेत.जयंत पाटील यांनी ट्वीट केलं असून या निर्लज्ज सरकारविरोधात लढत राहणार असं म्हटलं आहे. “या निर्लज्ज सरकारविरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय,” असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...