पराभव स्पष्ट दिसू लागल्यानंतर अचानक मोदींना या देशाचे सत्य उमगू लागले-प्रियंका गांधी

Date:

नवी दिल्ली – “तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी शेतकर्‍यांचा अपमान करून त्यांना दहशतवादी, देशद्रोही, गुंड, बदमाश असे म्हटले, आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला, त्यांना अटक करण्यात आली. आता निवडणुकीतील पराभव दिसू लागले, तेव्हा अचानक तुम्हाला या देशाचे सत्य समजू लागले. तुमच्या नशिबावर आणि तुमच्या बदलत्या वृत्तीवर विश्वास ठेवणे कठीण आहे.” अशी सडसडीत टीका प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.केंद्र सरकारने लागू केलेल्या तीनही कृषी कायद्यांना रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होते. आज सकाळी नऊ वाजता देशाला संबोधित करत कृषी कायदे मागे घेत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.पुढे प्रियंका म्हणाल्या की, शेतकरी आंदोलनादरम्यान 600 पेक्षाही अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, सुमारे 350 दिवसांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी संघर्ष केला. त्याची किंचितही काळजी तुम्हाला नव्हती. तुमच्याच सरकारमध्यला एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली, त्या अपघातात सर्वासमोर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तुमच्या पक्षातील नेत्यांनी शेतकऱ्यांचे अपमान केले असून, त्यांना दहशतवादी, देशद्रोही, गुंड, उपद्रवी असे म्हटले होते, आणि तुम्ही स्वत: शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हटले होते. त्यांच्यावर लाठ्या-काठ्याने वार करण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली. असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...