पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या चतुराईला आले यश – फरार काळात त्याला सहाय्य करणाऱ्यांना धरणार – त्याच्या अन्य सहकारी आरोपींसाठी नवे जाळे
पुणे : जमीन लाटणे, फसवणूक व धमकावणे,खंडणी मागणे अशा विविध १७ गुन्ह्यासह मोक्का तील आरोपी जो गेली दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देत आला असा तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे यास आज दुपारी पोलिसांनी अटक केली आहे. वृत्तपत्रे आणि माध्यमातील प्रतिनिधींच्या पत्रकार परिषदा घेऊन मोठ मोठ्या घोटाळ्यांच्या माहिती देत त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध करून माध्यमांचा फायदा उठवून, अनेकांना ब्लैकमेल करण्याचा धंदा करणारा बराटे अखेरीस आयुक्तांच्या खेळीपुढे नामोहरम झाला ,तत्पूर्वी रवींद्र बर्हाटे याच्या शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी जंग जंग पछाडले होते.नुकतीच त्यांची पत्नी संगीता, मुलगा मयुर बर्हाटे यांच्याबरोबर पिंताबर धिवार, अॅड. सुनिल मोरे यांना अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात चारी बाजूने फास आवळत आणला होता. त्यामुळे सर्व मार्ग बंद होत असल्याचे दिसल्यावर आज रवींद्र बर्हाटे याने पोलिसांशी संपर्क साधून आपण पोलीस आयुक्तालयात येत असल्याचे कळविले. त्यानुसार आज दुपारी तो पोलीस आयुक्तालयात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.आता त्याला फरार काळात सहाय्य करणाऱ्यांना सोडले जाईल असे चित्र नाही . याशिवाय आणखी फरार असलेले त्याचे सह आरोपी यांच्या साठी देखील पोलिसांनी जाळे विणल्याचे वृत्त आहे यामुळेच अन्य आरोपी लवकरच आता हाथी येतील असा दावा ही पोलिसांकडून होतो आहे . दरम्यान बराटे च्या अटके मुळे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कामाबाबत त्यांचे अभिनंदन होत आहे.

