Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राहुल गांधींच्या 3 तासांच्या ED चौकशीनंतर लंच ब्रेकमध्ये सोनियांना भेटले राहुल, पुन्हा ईडी कार्यालयात पोहोचले

Date:

नवी दिल्ली- नॅशनल हेराल्डप्रकरणी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची जवळपास तीन तास चौकशी केली. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास जेवणाची सुटी झाली आणि राहुल थेट सर गंगाराम रुग्णालयात दाखल असलेल्या सोनिया गांधींना भेटायला गेले.

त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही होत्या. सुमारे 40 मिनिटांनंतर राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात परतले. त्यांची चौकशी सुरू आहे.

याआधी सकाळी राहुल गांधी पूर्ण जोशात ईडीच्या कार्यालयात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना 50 हून अधिक प्रश्न विचारले. यापूर्वी काँग्रेसने या कारवाईला कडाडून विरोध केला होता. सकाळपासूनच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत ठिकठिकाणी राहुल यांचे पोस्टर लावले होते. ज्यावर लिहिले होते- ये राहुल गांधी है, झुकेगा नहीं. देशाच्या इतर भागांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. काँग्रेसने सर्व नेत्यांना संध्याकाळी 5.30 वाजता पक्ष कार्यालयात बोलावले आहे.

अनेक मुख्यमंत्री,माजी मुख्यमंत्री असलेल्या नेत्यांना अटक ,त्यांच्या भेटीला गेल्या प्रियांका

राहुल गांधींसोबत ईडी कार्यालयात जाणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि काँग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांचा समावेश आहे. प्रियांका गांधी यांनी तुघलक रोड पोलीस ठाणे गाठून या नेत्यांची भेट घेतली.

राहुल गांधींना घरातून ईडी कार्यालयात पोहोचण्यासाठी लागली 45 मिनिटे

  • 10.42 AM: प्रियांका गांधी यांच्यासह राहुल वाहनातून काँग्रेस मुख्यालयासाठी घरातून निघाले. तत्पूर्वी पक्षाचे अनेक मोठे कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचले होते.
  • 10:49 AM: राहुल ऑफिसच्या मुख्यालयात पोहोचले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे राहुल-प्रियांका यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
  • 10:58 AM: ED कार्यालयासाठी रवाना. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्ष मुख्यालयापासून ईडी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. राहुल यांच्यासोबत आलेल्या नेत्यांना पोलिसांनी ईडी कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर रोखले. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी बराच गदारोळ झाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • 11:27 AM: राहुल ईडी कार्यालयात पोहोचले. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंग, दीपेंद्र हुडा, पवन खेरा, पीएल पुनिया, गौरव गोगोई, मीनाक्षी नटराजन यांच्यासह काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले. मध्य दिल्लीतून बसमध्ये बसवून या नेत्यांना घेऊन गेले. येथे काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी तुघलक रोड पोलिस स्टेशनच्या एसएचओला पत्र देऊन पोलिस कर्मचाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे.

काँग्रेस मुख्यालय ते ईडी कार्यालयापर्यंतचा रस्ता सील

काँग्रेसची कामगिरी पाहता दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालय ते ईडी कार्यालयापर्यंतचा रस्ता सील केला होता. ईडी कार्यालयाजवळ तीन थरांची सुरक्षा व्यवस्था आहे. काँग्रेसचा मोर्चा पहिल्या सर्कलजवळ पोलिसांनी रोखला होता. येथे कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. याआधी सोमवारी सकाळी राहुल गांधींच्या तपासाविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयातून ताब्यात घेतले.

काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी राहुल गांधींच्या चौकशीच्या निषेधार्थ म्हटले – नॅशनल हेराल्डमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. नॅशनल हेराल्ड कंपनीने यंग इंडिया कंपनीची थकबाकी माफ करून कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले आहे. आम्ही भाजप सरकारप्रमाणे भारतातील सरकारी मालमत्ता विकल्या नाहीत.

विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया

अशोक गेहलोत : शांततापूर्ण मोर्चा काढण्यात सरकारला काय अडचण आहे?
भूपेश बघेल : तुम्ही या शरीराचा नाश करू शकता, पण विचारांना कैद करू शकत नाहीत.
प्रमोद तिवारी : राहुल गांधींवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
दिग्विजय सिंह : मोदी घाबरतात तेव्हा ते ईडीला पुढे करतात.
सचिन पायलट : केंद्र सरकार एजन्सीचा गैरवापर करत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत : राहुल गांधींवरील कारवाई बेकायदेशीर आहे. जो कोणी भाजपच्या विरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाते.
रॉबर्ट वाड्रा : राहुल गांधी सर्व बिनबुडाच्या आरोपातून निर्दोष मुक्त होतील आणि सत्याचा विजय होईल.
कार्ती चिदंबरम : मला बहुतेक वेळा ईडीच्या नोटिसा मिळाल्या आहेत. मी ईडी प्रकरणातील काँग्रेसचा तज्ज्ञ आहे.

काय आहे प्रकरण?

1938 मध्ये काँग्रेस पक्षाने असोसिएट जर्नल्स लिमिटेड (AJL) ची स्थापना केली. या अंतर्गत नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र प्रकाशित करण्यात येऊ लागले. त्यावेळी एजेएलवर 90 कोटींहून अधिक कर्ज होते आणि ते दूर करण्यासाठी आणखी एक कंपनी स्थापन करण्यात आली होती. ज्याचे नाव यंग इंडिया लिमिटेड होते. यामध्ये राहुल आणि सोनियांचा वाटा 38-38% होता.

एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला देण्यात आले. या बदल्यात यंग इंडिया एजेएलचे दायित्व भरेल, असे सांगण्यात आले, परंतु जास्त भागीदारीमुळे यंग इंडियाला मालकी हक्क मिळाले. एजेएलच्या दायित्वांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेसने दिलेले 90 कोटींचे कर्जही नंतर माफ करण्यात आले.

55 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप

2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया आणि राहुल यांच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. यामध्ये स्वामींनी गांधी परिवारावर 55 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. मात्र, या प्रकरणात ईडीची एंट्री 2015 मध्ये झाली.

या प्रकरणात आतापर्यंत काय-काय झाले?

  • 1 नोव्हेंबर 2012 रोजी सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली न्यायालयात खटला दाखल केला, ज्यामध्ये सोनिया-राहुल यांच्याव्यतिरिक्त मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांना आरोपी करण्यात आले होते. हे सर्व काँग्रेसशी संबंधित आहेत.
  • 26 जून 2014 रोजी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट यांनी सोनिया-राहुल गांधींसह सर्व आरोपींविरुद्ध समन्स जारी केले.
  • 1 ऑगस्ट 2014 रोजी ईडीने या प्रकरणाची दखल घेतली आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला.
  • मे 2019 मध्ये ईडीने या प्रकरणाशी संबंधित 64 कोटींची मालमत्ता जप्त केली.
  • 19 डिसेंबर 2015 रोजी दिल्ली पतियाळा कोर्टाने या प्रकरणात सोनिया, राहुल गांधींसह सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.
  • 9 सप्टेंबर 2018 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना दणका दिला होता. प्राप्तिकर विभागाच्या नोटिशीविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.
  • काँग्रेसने सुप्रीम कोर्टातही याला आव्हान दिले, पण 4 डिसेंबर 2018 रोजी कोर्टाने सांगितले की, इन्कम टॅक्सची चौकशी सुरूच राहील. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत कोणताही आदेश निघणार नाही.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...