एएफसी वुमन्स एशियन कप भारत २०२२ : जपानचा एकतर्फी विजय

Date:

पुणे, २१ जानेवारी २०२२ : दोन वेळच्या गतविजेत्या विजेत्या जपानने एएफसी वुमन्स एशियन कप भारत २०२२ स्पर्धेत म्यानमार संघाचा ५-० गोलने धुव्वा उडविला. तसेच या स्पर्धेतील आपली विजयी सुरुवात केली. या विजयामुळे संघ व्यवस्थापक फुतोशी एकेडा यांच्या जपानच्या संघाला आगामी सामन्यासाठी स्थान मिळाले आहे. पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुलात  झालेल्या क गटातील या सामन्यात जपानने जबरदस्त खेळ करत सामन्यावर एकतर्फी विजय मिळविला.

जपानची युवा महीला फुटबॉलपटू रिको युकी हिने जपान संघासाठी पहिल्या सत्रापासून शानदार कामगिरी करत जपान संघाला १-० गोलने आघाडी मिळवून दिली. तिने २२ व्या मिनिटाला पहिला गोल केला.त्यानंतर युई हासेगावा हिने ४७ व्या मिनिटाला आणि हिकारू नाओमोटो हिने ५२ मिनिटाला असे गोल करत या दोन्ही महिला फुटबॉलपटूनी दुसऱ्या सत्रात शानदार कामगिरी करत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर पयार्यी फुटबॉलपटू युई नारूमिया हिने ७० मिनिटाला आपल्या संघाचा शानदार चौथा गोल केला. त्याचवेळी सामन्याच्या अतिरिक्त वेळेत (इंज्युरी टाइम) हासेगावा हिने पाचवा गोल करत सामन्यावर वर्चस्व मिळविले.

जपानने सुरुवातीपासून शानदार खेळाचे प्रदर्शन केले. तसेच या चारही फुटबॉलपटुंनी केलेली आक्रमक  सुरुवात हेच जपानच्या विजयाचे कारण ठरले. युकी हिने मारलेला शानदार गोल यामुळे म्यानमारच्या फुटबॉलपटुंना संधी मिळाली नाही. २२ मिनिटांपासून म्यानमारच्या फुटबॉलपटु गोल करण्यासाठी धडपडत होत्या मात्र जपानी फुटबॉलपटुंनी सामान्यावरील आक्रमक पवित्रा यामुळे म्यानमारच्या फुटबॉलपटुंना गोल करता आले नाहीत  जपानच्या खेळाडूचा पाय सहा यार्डमध्ये पडला, त्यामुळे जपानची गोलकिपर अकाया यामाशिता हिला चेंडू खाली ठेवल्यामुळे दंड आकारण्यात आला.

या विजयासह जापानने सोमवारी होणाऱ्या व्हियेतनामविरुद्धची आपली स्थिती भक्कम केली आहे. म्यानमारची पुढची लढत कोरियाविरूद्ध होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...