Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जंगलाच्या पाऊलवाटेत शूटिंगचा साहसी अनुभव

Date:



 वातानुकुलित स्टुडिओमध्ये चित्रीकरण करण्यापेक्षा मोकळ्या हवेत, हिरवळीने वेढलेल्या आणि मोकळ्या आसमंता खाली काम करण्याचा अनुभव काही वेगळाच असातो. तेवढाच तो आव्हानात्मक असतो. दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या मराठी – कन्नड सिनेमाचं शूटिंग कर्नाटकात वेगवेगळ्या भागात सुरु आहे. मग ते रामगढच पठार असेल किंवा उडुपी जवळच हेबरी, चिकमंगलोर जवळचं बाबा भूदानगिरी, प्रत्येक लोकेशन वेगवेगळे होते. घनदाट जंगल, चढ उतारचा ट्रेक, नक्षल भागाचे आव्हान अशा वेगवेगळ्या परिस्थितीत या सिनेमाचं शूट झाले आहे. सिनेमाच्या कथेसाठी लोकेशनमध्ये अजिबात तडजोड केली नाही. ४-५ महिने दिग्दर्शकांनी या सिनेमाच्या लोकेशनसाठी रेकी केली आहे. अनेक कठिण परिस्थितीत या सिनेमाचं शूटिग पार पडले. त्यात दाक्षिणात्य स्टार कवीश शेट्टीचा पाय फ्रॅक्चर झाल्याने एक महिना शूटिंग थांबवावे लागले. त्याबद्दल कवीश सांगतो, ‘’पायाला दुखापत झाल्याने माझ्यासाठी हे शूट सोपे नव्हते. मात्र, पायाला दुखापत होऊनही मी शूटिंग केले. कारण, कलाकारांच्या आरामापेक्षा टेक्निकल टीमची मेहनत ही महत्वाची होती.  अशा डोंगराळ आणि खडकाळ भागात कॅमेरा आणि इतर सर्व उपकरणे नेणे खूपच अवघड होते.”  

अभिनेता विराट मडकेने सांगितले, ‘’निसर्गाच्या सानिध्यात शूटिंगचा अनुभव खूप भारी होता तेवढाच एडव्हेंचरस होता. मला स्वतःला चिकमंगळूर जवळचा बाबा भूदान गिरीचा इथल लोकेशन खूप आवडलं.  आम्ही पहाटे ४-५ वाजता उठून लोकेशन वर  जायचो. मूळ शहरापासून ५० किमी वर हे लोकेशन असायचं. लोकेशन वर पोहचून
 मग १५ – २० मिनिटांचा  ट्रेक करायचा होता. एवढे चालल्यानंतर समोर दिसायचे निसर्गरम्य दृष्य आणि त्या वातावरणाने सगळा शिणवटा निघून जायचा. या सगळ्यात उत्तम सिनेमाचा भाग असल्याचे समाधान होतं.” तर शिवानी सुर्वेसाठी हा अनुभव न विसरता येण्यासारखा होता. माझ्यासाठी हा कधी न विसरता येणारा अनुभव होता. मी पहिल्यांदाच अशा प्रकारे जंगलात जाण्याचा अनुभव घेतला होता.  मी ट्रेकिंगवाली मुलगी मुळीच नाही आहे. एका ठिकाणी तर शूटिंग लोकेशनला जाण्यासाठी दोर पकडून खाली उतरायचं होतं. काही वेळा व्हॅनिटीही नव्हत्या. त्यामुळे सेटवरही कधी दगडावर, तर कधी झऱ्याशेजारी आम्ही बसलो होतो. त्यामुळे पुढचे अनेक वर्ष मी हा अनुभव विसरणार नाही.”
‘’करिअरच्या सुरुवातीला शूटिंगचा असा अनुभव मिळाल्याने खूप समाधान आहे, आणि त्यात सहकलाकार इतके चांगले असल्याने हा प्रवास सोपा झाला. एरवी जंगलात जाणे वेगळे आणि कामासाठी तिथे वावरण्यात वेगळाच अनुभव आहे”, असं अश्विनी चावरेने सांगितले.
हा चित्रपट प्रेक्षकांनाही खास अनुभव देऊन जाईल. तसंच या कथेचा आणि लोकेशनचा काय संबंध आहे हे लवकरच कळेल. दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्टरी च्या या सिनेमात कन्नड कलाकार कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके आणि अश्विनी चावरे दिसून येणार आहेत. तर याचे दिग्दर्शन सदागरा राघवेंद्र करत आहेत. 


-शरद लोणकर

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या -देवेन्द्रजी तुम्ही करत काय आहात ?

पुणे-महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या प्रचंड...

11 सरकारी रुग्णालयातून ‘बोगस’ औषधींचे वितरण:मंत्र्यांची कबुली

नागपूर:राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा आणि वापर...

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...