पुणे – मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेची निर्धार बैठक संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी महिलांसाठी लढणाऱ्या,त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या सक्रीय अशा वकील आणि कार्यकर्त्या अॅड राजश्री अडसूळ यांची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी नियुक्तीचे पत्र रमेश बागवे यांनी त्यांना प्रधान केले. यावेळी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे, समन्वयक विठ्ठलराव थोरात, जनरल सेक्रेटरी अरुण गायकवाड, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना बागवे म्हणाले कि,राज्यात दिवसेंदिवस मागासवर्गीय महिला भगिनीच्या अत्याचार मध्ये लक्षणीय वाढ झाली असून, ह्या अन्याय अत्याचाराला पायबंध घालण्यासाठी, संघटनेच्या महिला भगिनींची एक सक्षम फळी निर्माण करण्यासाठी अॅड राजश्री अडसूळ आपण पुढाकार घ्यावा. असे आव्हान करण्यात आले.
मातंग एकता आंदोलनच्या महीला आघाडीच्या शहराध्यक्षपदी अॅड राजश्री अडसूळ
Date:

