पुणे: वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. सतिश मुळीक यांची निवड झाली आहे. अध्यक्ष पदासाठी झालेल्या तिरंगी लढतीमध्ये सर्वाधिक 2 हजार 291 मते घेऊन ते विजयी झाल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे यांनी यांनी दिली.
उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी झालेल्या तिरंगी लढतीत अॅड. योगेश तुपे हे 2 हजार 774 मते घेऊन, तर बारचे माजी सचिव अॅड. सचिन हिंगणेकर हे 2 हजार 505 मते घेऊन विजयी झाले.
सचिव पदी अॅड. धनश्याम दराडे आणि अॅड. विकास बाबर हे विजयी झाले. त्यांना अनुक्रमे 2 हजार 426 आणि 2 हजार 151 मते मिळाली. खजिनदार पदी अॅड. भाग्यश्री गुजर-मुळे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. हिशेब तपासणीस पदी अॅड. ओंकार चव्हाण हे 2 हजार 629 मते घेऊन विजयी झाले. अॅड. महेश भांडे, अॅड. आनंद धोत्रे, अॅड. विराज करचे, अॅड. आकाश मुसळे, अॅड. प्रिती पंडित, अॅड. सचिन पोटे, अॅड. अक्षय रतनगिरी, अॅड. अमोल तनपुरे, अॅड. अमित यादव आणि अॅड. सुषमा यादव यांची कार्यकारिणी सदस्य पदी यापूर्वीच निवड झाली आहे.
निवडणूकीसाठी सुमारे 7 हजार वकिलांची मतदार म्हणून नोंदणी झाली होती. त्यापैकी 4 हजार 314 वकिलांनी मतदारानाचा हक्क बजावला. यावर्षीही गेल्या वर्षीप्रमाणे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतदान झाले. शिस्तीत, नियोजनात मतदान प्रक्रीया पार पाडल्याचे वकील वर्गातून सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोवस्त ठेवण्यात आला होता.
निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे यांनी, तर अॅड. विजय आमले, अॅड. अनिल नाईक, अॅड. नंदकुमार वीर, अॅड. प्रशांत माने, अॅड. के.टी. आरू-पाटील, अॅड. किर्तीकुमार गुजर, अॅड. सुप्रिया कोठारी, अॅड. समीर घाटगे, अॅड. विजयराव दरेकर आणि अॅड. मंगेश लेंडघर यांनी अतिरिक्त निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
- अॅड. पंडित धुमाळ, अॅड. अनिशा फणसळकर, अॅड. रेखा करंडे, अॅड. महेंद्र कुमकर, अॅड. विजयकुमार शिंदे, अॅड. सुहास फराडे, अॅड. विजय माने आणि अॅड. जयदीप कदम यांनी उपनिवडणूक अधिकारी म्हणूअ भूमिका बजावली. आहेत. तर, अॅड. सुधीर घोरपडे,अॅड. संतोष घुले, अॅड. विक्रम हगवणे, अॅड. राकेश ओझा, अॅड. प्रतिक देशमाने, अॅड. स्वप्निल चांदेरे, अॅड. राहुल भरेकर, अॅड. श्रृती संकपाळ आणि अॅड. मुकुंद पवार हे सहायक निवडणूक अधिकारी होते. या सर्व निवडणूक प्रक्रीयेच्या वेळी बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अॅड. राजेंद्र उमाप उपस्थित होते.