येरवडा येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

Date:

पुणे दि.१८: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या येरवडा येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. येथे १०० मागासवर्गीय मुलींना अकरावी ते बारावी, पदविका व  आयटीआय या वर्गासाठी मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

वसतिगृहात सर्व सुविधा मोफत पुरविल्या जात असून यामध्ये दरमहा ८०० रूपये  निर्वाहभत्ता, १०० रूपये स्वच्छतेसाठी तर प्रत्येक शैक्षणिक वर्षात  स्टेशनरीसाठी  ४ हजार रूपये देण्यात येतात. सहल, गणवेश, अॅप्रन व प्रोजेक्टसाठी शासननिर्णयाप्रमाणे रक्कम देण्यात येत असून मोफत भोजन सुविधाही पुरविली जाते.

वसतिगृहात प्रवेशासाठी तहसीलदार यांचा मागील वर्षाचा उत्पनाचा दाखला, मागील वर्षाचे गुणपत्रक, जातीचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र या कागदपत्रांसह इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, पुणे- ०२०-२९७०६६११, संत जनाबाई मुलींचे शासकीय वसतिगृह पुणे- ०२०-२६३६०९६०,  मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येरवडा-९५६१५६८४५९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल यांनी केले आहे.
000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...