राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग मधील विद्यार्थी घेत आहेत गगनभरारी
पुणे- महानगरपालिका संचलित राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ-लर्निग स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पुणे या कनिष्ठ महाविद्यालयाचे 500 हुन अधिक विद्यार्थी आयआयटी,मेडिकल अश्या विविध क्षेत्रात करिअर करत आहे. आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुणे महानगरपालिकेच्या शाळेतून पूर्ण करून कनिष्ठ शिक्षण देखील महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेऊन सचिन कंबळे या विद्यार्थ्याची आयआयटी खरगपूर येथे निवड झाली ही महानगपालिकेसाठी अभिमानाची बाब आहे. राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंगची मुले अशी गगनभरारी घेत आहेत त्यातून बलशाली भारत करणारी पिढी तयार होत आहे असे काँग्रेस पक्षाचे मा जी उपमहापौर आबा बागुल म्हणाले
आबा बागुल म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळाल्यास ते काहीही साध्य करू शकतात. या उद्देशाने सुरू केलेली राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग स्कूल व ज्यू कॉलेजचे विद्यार्थी अशी अविस्मरणीय कामगिरी करत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. महानगरपालिकेच्या शाळेवर चांगल्याप्रकारे लक्ष दिल्यावर त्यातून असे उत्तम विद्यार्थी घडतील व देशाला महासत्ता बनवतील असा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला.

