पुणे- भारती विदयापीठ परिसरामध्ये एका व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दाखल गुन्ह्यात पोलीसांना वेळोवेळी गुगंरा देणाऱ्या व फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करून पोलीसांनी वारजे पोलीस स्टेशनमधील प्राणघातक हल्ल्याचा दाखल गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. तर परिसरात कोयता घेऊन राजरोसपणे फिरणाऱ्या एका संशयितांस मिळालेल्या माहितीच्या आधारे शिताफीने अटक करून एकाच दिवशी दोन वेगवगळ्या गुन्ह्यात आरोपींना गजाआड केल्याची कौतुकास्पद कामगिरी भारती विदयापीठ पोलीसांनी केली आहे.
भारती विद्यापीठ परीसरात ०३ नोव्हे रोजी मयत सुनिल रामचंद्र भरगंडे (वय ४७, रा.राजगड कॉलनी, अय्यप्पा स्वामी मंदिराजवळ, संतोषनगर, कात्रज, पुणे) यांस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी निलेश दत्तात्रय सातपुते (वय २८, रा. दत्तमंदीरासमोर, राजहंस कॉलनी, कोथरूड, पुणे) यांच्यावर गुन्हा करण्यात आला होता.दाखल गुन्ह्यातील आरोपी निलेश सातपुते हा गुन्हा केल्यापासून फरार झाला तसेच तो वेळोवेळी पोलीसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता.
दरम्यान, भारती विदयापीठ पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेत असतांना पोलीस अमंलदार विक्रम सावंत यांना त्याच्या बातमीदारामार्फत फरार आरोपी निलेश दत्तात्रय सातपूते हा कात्रज गावातील शंकर मंदीराजवळ येणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली त्याआधारे वरिष्ठांनी आरोपीस अटकाव करण्याकामी दिलेल्या आदेशानूसार भारती विदयापीठ पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.गंगाधर घावटे यांच्या अधीपत्याखाली पोलीस अमंलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचुन आरोपी निलेश दत्तात्रय सातपुते याला शिताफीने ताब्यात घेतले व त्याची तपासकामी सखोल चौकशी केली असता आरोपीने चौकशीत पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये शरीरीविरुध्द १० गंभीर गुन्हे आहेत. तसेच आरोपीने वारजे पोलीस हद्दित कुख्यात गुन्हेगार रोहीत पासलकर याला पुर्ववैम्यनस्यातुन साथीदाराच्या मदतीने प्राणघातक हल्ला केल्याची कबूली दिली.
कोयता घेऊन राजरोसपणे फिरणाऱ्यास अटक ..
८ नोव्हे रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी व जबरी चोरीस प्रतिबंधात्मक कारवाईकामी कात्रज, दत्तनगर चौक येथे पेट्रोलिंग करत असतांना पोलीस अंमलदार विक्रम सांवत व अभिजित जाधव यांना बातमीदारामार्फत कात्रज नविन वसाहत सार्वजनिक शौचालया समोर, कात्रज, पुणे येथे एक संशयीत इसम कोयत्या जवळ बाळगून राजरोसपणे फिरत असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली त्याआधारे वरिष्ठांनी संशयीतास अटकाव करण्याकामी दिलेल्या आदेशानूसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या अधीपत्याखाली तपास पथकातील अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचुन बदामी रंगाचा त्यावर काळे रंगाचे ठिपके असलेला शर्ट घातलेला संशयीत इसम सुजित सुरेश सरपाले (वय २५, रा.एम.आय.टी बिल्डींग, ओम साई मित्र मंडळ जवळ, संतोषनगर, कात्रज, पुणे) यास ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून एक लोखंडी कोयता जप्त करत त्याच्याविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा करण्यात आला
सदरची कामगिरी ही, सागर पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०२, सर्जेराव बाबर सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगटे विभाग,जगन्नाथ कळसकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, अर्जुन बोत्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनूसार तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या अधीपत्याखाली पोलीस हवलदार सोमनाथ सुतार, संतोष भापकर,सर्फराज देशमुख,सचिन पवार, अभिजीत जाधव, राहुल तांबे, गणेश शेंडे, विक्रम सावंत यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.

