कंपनीच्या ‘ऑनलाइन’ वितरण व्यवस्थेचे ‘ऑफलाइन’ विस्तारीकरण
हैदराबाद : मोबाइल अॅक्सेसरीज ऑनलाईन विक्रीमध्ये भारतामध्ये पहिला क्रमांक पटकावणाऱ्या ‘पीट्रॉन’ कंपनीने आता ऑफलाइन बाजारपेठ काबीज करण्यासाठी एक विशेष योजना आखली आहे. या योजनेनुसार ‘पीट्रॉन’ने भारतामधील आपला सहावा मुख्य वितरक म्हणून ‘प्लेटाइम इलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीची नियुक्ती केली आहे. ही कंपनी हैदराबाद आणि तेलंगणा विभागातील काम पाहणार आहे. ‘पीट्रॉन’चे इतर पाच वितरक नवी दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, पुणे आणि जयपूर येथे कार्यरत आहेत. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत ‘पीट्रॉन’ प्रॉडक्ट्सच्या एकूण वितरकांनी आता चाळीशीचा आकडा ओलांडला असून देशभरातील १२ राज्यांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे.
सध्याचे वितरण जाळे हे ७०० रीटेल आऊटलेटपर्यंत पोचणारे असून त्याद्वारे दर महिन्याला १५ हजार मोबाईल अॅक्सेसरीजची विक्री केली जाते. ‘पीट्रॉन’ने १२० वितरकांच्या नियुक्तीचे लक्ष्य आखले असून त्याद्वारे चालू वित्तीय वर्षाअखेर दर महिन्याला ५० हजार मोबाईल अॅक्सेसरीजच्या विक्रीची योजना आहे. ऑफलाइन विक्रीमध्ये ‘सेल पॉईंट’सारख्या आजच्या काळातील मोबाईल रीटेलर विक्रेत्याचा समावेश असून या कंपनीने ‘पीट्रॉन’चे प्रॉडक्ट्सच्या आपल्या केंद्रांवरून विक्रीस सुरुवात केली आहे.
‘पीट्रॉन’ने वितरण जाळे उभारण्यासाठी ३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच अतिरिक्त २ कोटींचा निधी हा रीटेल भागीदारांना पाठबळ देण्यासाठी मंजूर केला आहे. हे पाठबळ ब्रॅंड सक्षमीकरण आणि विविध मार्केटिंग उपक्रमांसाठी देण्यात येणार आहे.
‘प्लेटाइम इलेक्ट्रॉनिक्स’चे श्री. विनय पारवानी म्हणाले, “विविध पद्धतीची दर्जेदार प्रॉडक्ट्स आणि किफायतशीर मूल्यामुळे ‘पीट्रॉन’ प्रॉडक्ट्सना रीटेल केंद्रांवर ग्राहकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
आंध्रप्रदेशमधील प्रमुख वितरक आणि ‘ग्राम सर्किट’चे श्री. श्रीधर एज्युपुगंती म्हणाले, “पीट्रॉन अॅक्सेसरीजने भारतामधील ऑनलाईन बाजारपेठेवर चांगला ठसा उमटवला आहे. त्यामुळे ‘पीट्रॉन’शी जोडले जाण्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे.”
पीट्रॉनने आतापर्यंत विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांपर्यंत ५० लाख वस्तू पोचविल्या आहेत. देशभरात सर्वात मोठी मोबाईल अॅक्सेसरीजची रेंज पीट्रॉनकडेच उपलब्ध असून सातत्याने त्यात नवीन मॉडेल्सची भर पडत असते. त्यामुळे ऑडिओ चार्जर्स, वीअरेबल्स आणि ब्लुटुथ प्रॉडक्ट्सचा समावेश आहे. आपल्या भक्कम डिझायन टीमच्या सहकार्याने पीट्रॉनने ३ ‘पेटंट्स’साठी अर्ज दाखल केला आहे. भारतामधील आपल्या ब्रॅंडला मिळालेले यश पाहून ‘पीट्रॉन’ची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचीही योजना आहे.
पीट्रॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमीन ख्वाजा म्हणाले, “पोर्टेबल मोबाईल अॅक्सेसरीज बाजारपेठेत इतरही काही कंपन्या कार्यरत असल्या तरी दर्जा आणि किफायतशीर किंमत या दोन गोष्टींमध्ये ‘पीट्रॉन’ इतरांपेक्षा पुढे आहे. या कंपनीच्या प्रॉडक्ट्स ही ‘बीआयएस’ मानांकीत असून त्यासाठी एक वर्षाची वॉरंटीही देण्यात आली आहे. सुरक्षा
आणि विश्वासार्हता या दोन गोष्टींमुळे तरुण वर्गाकडून ब्रॅंडेड मोबाईल अॅक्सेसरीजला पसंती दिली जाते. हा वर्ग आमच्या प्रॉडक्ट्सचा ग्राहक आहे.
पीट्रॉनबद्दल :
‘पीट्रॉन’ ही मोबाईल अॅक्सेसरीज क्षेत्रामधील नामांकीत कंपनी आहे. ऑडिओ आणि चार्जिंग उपकरणांसह या कंपनीकडे इतर विविध प्रॉ़डक्ट्स आहेत. या कंपनीची मालकी ‘पालरेड ऑनलाईन टेक्नॉलॉजीस प्रा. लि.’कडे आहे. ही कंपनी ‘पालरेड टेक्नॉलॉजीस लि.’ची उपकंपनी असून ती मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात २००४ पासून अस्तित्वात आहे.