~ कूलिंग लॉस 50% पर्यंत कमी करेल अशा ‘डुअ फ्लो’ तंत्रज्ञानाचा प्रवेश
पुणे: गोदरेज अप्लायन्सेस या होम अप्लायन्सेस सेग्मेंटमधील एका आघाडीच्या कंपनीने, गोदरेज एज ड्युओ – स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह भारतातील पहिला सिंगल रेफ्रिजरेटर रेंज सादर करून रेफ्रिजरेटर श्रेणीतील नावीन्याचे अनावरण केले.
भारतातील रेफ्रिजरेटर वापरणाऱ्या अंदाजे 80% घरांमध्ये सिंगल डोअर किंवा डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर वापरला जातो. भारतीय ग्राहक दिवसातून कमीतकमी दहा वेळा रेफ्रिजरेटर उघडतात, त्यातील व्हेजिटेबल भाग 40% पेशा जास्त वेळा वापरला जातो. कंपनीने केलेल्या अंतर्गत लॅब टेस्टमध्ये आढळले की, जर एका तासामध्ये रेफ्रिजरेटर प्रत्येकी 30 सेकंदांसाठी 3 वेळा उघडला जातो, त्यामुळे कूलिंग चेंबरच्या तापमानात 100% वाढ होते. थंड हवा कमी झाल्यास आतमध्ये ठेवलेल्या अन्नाला थर्मल शॉक बसतो व त्याचा परिणाम अन्नाच्या ताजेपणावर होतो. रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये योग्य तापमान राखण्यासाठी कॉम्प्रेसर 2 तास काम करतो व त्यामुळे ऊर्जेचा वापर सर्वोच्च केला जातो.
या निष्कर्षांचा विचार करता, गोदरेज अप्लायन्सेसने स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरसह ‘गोदरेज एज ड्युओ’ हा भारतातील पहिला सिंगल डोअर रेफ्रिजरेटर सादर करण्यात आला. त्यामध्ये विशेष ड्युओ फ्लो टेक्नालॉजी आहे, ज्यामुळे ग्राहकांना भाज्यांसाठी संपूर्ण रेफ्रिजरेटरचे दार उघडावे लागत नाही व कूलिंग कमी होण्याचे प्रमाण 50% कमी होते. फ्रीझरमधील खास लोव्हर्समुळे स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरमध्ये हवेचा मोठा झोत येतो. कूलिंग लॉसमध्ये झालेली घट व इन्व्हर्टर कॉम्प्रेसरचे फायदे यामुळे गोदरेज एज ड्युओ रेफ्रिजरेटर्स ऊर्जाक्षम व किफायतशीर ठरतात. डिझाइनमध्ये विशिष्ट्य वैशिष्ट्ये समाविष्ट करून, सर्वात ऐसपैस व्हेजिटेबल ड्रॉवर, सर्वात मोठा फ्रीझर व ड्राय स्टोअरेज समाविष्ट करून, तसेच डोअर शेल्फमध्ये 2.25-लिटर बाटल्यांची जागा ठेवून व चिलरमध्ये 1 लिटरच्या पाच बाटल्यांपर्यंतची तरतूद करून जागेचा जास्तीत जास्त वापर केला आहे. रेफ्रिजरेटरमध्ये एलईडी लाइटचा वापर केल्याने त्याचे सौंदर्य खुलते. हे उत्पादन निळ्या व वाइन रंगांमध्ये उपलब्ध असून फ्लोरल फेशियाचे अनेक पर्याय आहेत.
पर्यावरण व शाश्वततेप्रती गोदरेजने केलेल्या बांधिलकीनुसार, रेफ्रिजरेटरमध्ये सर्वात पर्यावरणपूरक रेफ्रिजरंट R600a वापरले जाते, त्यामध्ये झीरो ओझोन डिप्लिशन क्षमता आहे व यामुळे कार्बनचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हा फ्रिज अतिशय कमी व्होल्टेजवरही चालू शकतो व यामुळे वीज नसताना घरातल्या इन्व्हर्टरवर ह्याचा वापर करता येतो. या नव्या 4 स्टार रेटेड रेफ्रिजरेटर्समुळे ग्राहकांना 3 स्टार रेफ्रिजरेटरच्या इतक्याच क्षमतेसाठी आणखी 3850 रुपयांची बचत करता येईल व यासोबत 10 वर्षांची कॉम्प्रेसरची वॉरंटी मिळते.
याविषयी बोलताना, गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड व ईव्हीपी कमल नंदी यांनी सांगितले, “एक कंपनी म्हणून गोदरेजने नेहमीच नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सातत्याने नवे शोधतो, नावीन्य आणतो व आमच्या ग्राहकांना अद्ययावत उत्पादन व सेवा देऊन आनंद देण्याच्या एकमेव उद्दिष्टासाठी प्रयत्न करत असतो. आमच्या नव्या गोदरेज एज ड्युओ रेफ्रिजरेटरच्या मानव-केंद्रित डिझाइनमध्ये सोय व कार्यक्षमता केंद्रस्थानी ठेवली आहे. ‘सोच के बनाया है’ हे आमचे ब्रँडचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी मदत होण्यासाठी आम्ही संपूर्ण कंपनीमध्ये धोरणात्मक व नावीन्यपूर्ण विचारांची संस्कृती अंगिकारण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या नव्या उत्पादनामुळे, सिंगल डोअर रेफ्रिजरेटर श्रेणीमध्ये आघाडीचे स्थान मिळवू शकू, असा विश्वास वाटतो.”
रेफ्रिजरेटरचे प्रॉडक्ट ग्रुप हेड अनुप भार्गव म्हणाले, “गोदरेज एज ड्युओमुळे रेफ्रिजरेटर श्रेणीमध्ये नवा काळ सुरू होणार आहे. भारतातील अंदाजे 80% ग्राहक अजूनही सिंगल डोअर रेफ्रिजरेटर्स खरेदी करतात आणि क्रांतीकारी ड्युओ फ्लो तंत्रज्ञान व जागेच्या योग्य वापरासह स्वतंत्र व्हेजिटेबल ड्रॉवरचे खास डिझाइन, विजेचा कमी वापर व अन्य वैशिष्ट्ये यामुळे गोदरेज एज ड्युओ बाजी मारणार आहे.”
नवे गोदरेज एज ड्युओ फ्लो सिंगल डोअर डीसी रेफ्रिजरेटरची किंमत 23,000 – 25,000 रुपये आहे.