Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सॅमसंग मोठ्या व उत्तम प्रीमिअम रेंजद्वारे भारतातील टीव्ही बाजाराचा ‘आकार वाढवणार’

Date:

मुंबईसॅमसंग या भारतातील सर्वात विश्वासार्ह कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने व सलग 13 वर्षे टेलिव्हिजन टेक्नालॉजीमध्ये आघाडीवर असलेल्या कंपनीने 2018 या वर्षासाठी पूर्णतः नव्या व आकर्षक टेलिव्हिजनचे नियोजन केल्याचे आज जाहीर केले. त्यामध्ये महत्त्वाच्या क्यूएलईडी, मिड-रेंज यूएचडी व मेक फॉर इंडिया ‘कॉन्सर्ट’ सीरिजमधील नव्या मॉडेलचा समावेश आहे.

सॅमसंगने भारतीय बाजारात विविध श्रेणींमध्ये महत्त्वपूर्ण उत्पादने दाखल केली आहेत. हा ब्रँड एलईडी टीव्ही, स्मार्ट टीव्ही, कर्व्ह्ड टीव्ही, कर्व्ह्ड यूएचडी टीव्ही व आता क्यूएलईडी टीव्ही व द फ्रेम अशा बाजारातील पहिल्यावहिल्या नावीन्याच्या माध्यमातून नेहमी आघाडीवर राहिला आहे.

भारतातील ग्राहक मोठ्या आकाराचा आणि मोठ्या व उत्तम टेलिव्हिजनचा विचार करत आहेत. आम्ही यूएचडी लाइन-अपमध्ये 60% वाढ करून आणि नवी उत्पादने दाखल करून या ट्रेंडला चालना देत आहोत आणि अॅम्बिएंट मोड व दर्जेदार साउंड क्वालिटी अश वैशिष्ट्ये असलेली नवी उत्पादने दाखल करत आहोत,” असे सॅमसंग इंडियाच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजीव भुतानी यांनी सांगितले.

 आम्ही मोठ्या प्रमाणात ग्राहकांचे संशोधन केले आणि ग्राहकांना त्यांच्या लिव्हिंग रूमसाठी केवळ टीव्हीपेक्षा अधिक काहीतरी अपेक्षित असल्याचे आढळून आले. सॅमसंग क्यूएलईडी टीव्हीमधील अॅम्बिएंट मोडमुळे तो घराच्या अंतर्गत सजावटीचा एक भाग बनून जाईल. भारतातील टीव्ही ग्राहकांसाठी साउंड हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, असेही आढळले आहे व त्यामुळे आम्ही कॉन्सर्ट सीरिज विकसित केली असून ती उत्तम साउंड देण्याच्या दृष्टीने तयार केली आहे. तसेच, यूएचडी सीरिजमध्ये अनेक प्रकारची नावीन्यपूर्ण व अपूर्व वैशिष्ट्ये आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

क्यूएलईडी टीव्ही

2018 क्यूएलईडी टीव्हीमध्ये, सॅमसंग अॅम्बिएंट मोड दाखल करत आहे. अॅम्बिएंट मोडमुळे तुम्हाला क्यूएलईडी टीव्हीचे रूपांतर तुमचे मूड व्यक्त करणाऱ्या कॅनव्हासमध्ये करता येऊ शकते. टीव्ही बेमालूमपणे भिंतीमध्ये मिसळून जाण्यासाठी आवश्यक असलेला व्हिज्युअल इफेक्ट निर्माण करण्यासाठी टीव्ही त्याच्या मागील भिंतीवर एक पॅटर्न तयार करू शकतो. तसेच, टीव्ही तुम्हाला आपोआप हवामान दर्शवतो व हवामान उन्हाळी किंवा पावसाळी किंवा बर्फाळ असल्याचे दाखवले जाते. तसेच, तुम्ही स्वतःचे फोटो किंवा आकर्षक कलाकृती वापरून बॅकग्राउंड तुम्हाला जशी हवी आहे तशी ठेवू शकता. क्यूएलईडी टीव्ही रिमोटवरील हॉटकी दाबून अॅम्बिएंट मोड वापरता येऊ शकतो.

2018 क्यूएलईडीमध्ये एक अदृष्य कनेक्शन असून, त्यामुळे एकेरी, जवळजवळ अदृष्य केबलमुळे तुम्हाला डेटा व पॉवर ट्रान्समिट करता येऊ शकते. सक्षम, वेगवान व भविष्यात्मक केबलमुळे तुम्हाला जिथे हवा आहे तिथे टीव्ही ठेवता येऊ शकतो व सर्व कनेक्टेड उपकरणे टीव्हीपासून दूर ठेवता येऊ शकतात.

इंटलिजंट डिस्प्लेमध्ये तुमचा टीव्ही नियंत्रित करण्याची बुद्धिवान पद्धत आहे. क्यूएलईडी टीव्हीमध्ये तुम्हाला बटणांची गरज नाही व तुम्ही एस व्हॉइसद्वारे स्मार्ट पद्धतीने संवाद साधू शकता. एस व्हॉइसमुळे तुम्हाला केवळ सूचनांद्वारे क्यूएलईडी टीव्ही नियंत्रित करता येऊ शकतो. उदाहरणार्थ, जर मी विचारले – हवामान कसे आहे? – टीव्ही स्क्रीनवर हवामानाची माहिती दाखवेल.

क्यूएलईडी टीव्हीमध्येही स्मार्ट थिंग्स अॅप आहे, जे सिंक करणे व कंटेंट शेअर करणे, नोटिफिकेशन पाठवणे व स्क्रीन व साउंड यांचे प्रतिबिंब दर्शवणे यासाठी टीव्हीला अन्य आयओटी एनेबल्ड उपकरणांशी जोडू शकते. याचबरोबर, ते 100% कलर व्हॉल्युम व HDR10+ कार्यामार्फत उत्कृष्ट पिक्चर क्वालिटी देते. त्यामुळे बारकावेही उठून दिसतात. स्लिम, स्लीक व प्रीमिअम मेटल बॉडी यांचा मेळ बेझेल-लेस डिस्प्लेशी घालत, क्यूएलईडी टीव्ही अप्रतिम सोफिस्टिकेशनसाठी टोन निर्माण करतात.

2018 मध्ये भारतात 55-इंच ते 75-इंच आणि फ्लॅट व कर्व्ह्ड प्रकारची 8 क्यूएलईडी टीव्ही मॉडेल दाखल केली जातील. क्यूएलईडी टीव्ही रेंज 2,45,000 रुपयांपासून सुरू होईल.

यूएचडी टीव्ही

सॅमसंगच्या यूएचडी टीव्हीमध्ये स्लिम मॅट बॉडीमध्ये उत्तम पिक्चर क्वालिटी व आलिशान डिझाइन आहे. दर्जेदार हाय डायनॅमिक रेंजचे बळ असलेल्या, सॅमसंग यूएचडी टीव्हीचा ब्राइटनेस, काँट्रास्ट ठसठशीत आहे, उत्तम बारकावे आहेत व अचूक रंग आहेत. तसेच, विस्तारलेल्या कलर स्पेक्ट्रमवरही रंग सुस्पष्ट दिसावेत, यासाठी हाय रिझोल्यूशन मिळण्यासाठी डायनॅमिक क्रिस्टल कलर तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला आहे.टू-वे ऑडिओ स्ट्रीमिंगचा आनंद घेण्याच्या हेतूने, तुमचा स्मार्टफोन टीव्हीशी किंवा टीव्ही स्मार्टफोनशी किंवा टीव्ही ब्लुटूथ स्पीकरशी पेअर करण्यासाठी यूएचडी प्रकारामध्ये वन रिमोट कंट्रोल, स्मार्ट हब व स्मार्ट कन्व्हर्जन्स समाविष्ट आहे.या नव्या उत्पादनांमुळे यूएचडी लाइन-अपमध्य 10 मॉडेलवरून 16 मॉडेलपर्यंत वाढ केली जाणार आहे. एन्ट्री लेव्हल यूएचडीची सुरुवात 7100 सीरिजवरून होईल व त्यानंतर 7470, 8000 व शेवटी फ्रेम असेल. यूएचडी टीव्ही रेंज 64,900 रुपयांपासून असेल.

कॉन्सर्ट सीरिज

‘मेक फॉर इंडिया’ नावीन्याचा भाग म्हणून, सॅमसंगने कॉन्सर्ट सीरिज दोन प्रकारांमध्ये आणली आहे – स्मार्ट कॉन्सर्ट व जॉय कॉन्सर्ट.टीव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी साउंड क्वालिटी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ग्राहकांना लाउड व्हॉल्युम व सिनेमॅटिक साउंड क्षमा अपेक्षित असते, जेणे करून त्यांना सिनेमा, संगीत व खेळ यांचा आनंद टीव्हीवर घेता येऊ शकतो. भारतीयांची साउंडविषयक गरज नव्या साउंड तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्ण करण्यासाठी 2018 कॉन्सर्ट सीरिजची निर्मिती केली असून त्यामध्ये शक्तिशाली सिनेमॅटिक सराउंड ऑडिओ अनुभव देण्यासाठी हार्डवेअर व सॉफ्टवेअरमधील सुधारणांची सांगड घातली आहे.

कॉन्सर्ट सीरिजमध्ये 2 नाही, तर 4 स्पीकर्स असतील – दोन टॉपवर व दोन बॉटमला. एकत्रितपणे 40 वॅट सराउंड साउंड अनुभव देण्यासाठी प्रत्येक चॅनल 10 वॅट साउंड आउटपुट देते.

स्मार्ट कॉन्सर्ट सीरिजमध्ये ब्लूटूथ क्षमता असून त्यामुळे युजरना त्यांचा स्मार्टफोन किंवा स्पीकर टीव्हीशी पेअर करता येई व कस्टमेबल आधुनिक युजर इंटरफेस आहे. स्मार्ट कॉन्सर्ट प्रकारातील स्मार्ट हब वैशिष्ट्यामुळे युजरना लाइव्ह टीव्ही उपलब्ध होतो व जिओ सिनेमा, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, बिग फ्लिक्स अशा विविध अॅप्समध्ये कण्टेण्ट ब्राउज करता येतो.

स्मार्ट कॉन्सर्ट व जॉय कॉन्सर्ट 32”, 43” व 49” या आकारांमध्ये आणि 27,500 रुपयांपासून उपलब्ध आहेत.

फील द गेम सवलत

जूनपासून सुरू होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर, सॅमसंगने मोठा स्क्रीन व प्रीमिअम टीव्ही घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी “फील द गेम” सवलत जाहीर केली आहे. 2018 क्यूएलईडी टीव्हींच्या ग्राहकांना मोफत गॅलेक्सी S9 व 10 वर्षे नो स्क्रीन बर्न इन वॉरंटी दिली जाई. तसेच, अन्य निवडक टीव्हीच्या खरेदीवर फ्री साउंडबार किंवा स्पीकर अशी बक्षीसे दिली जातील. ही सवलत भारतभर जुलै 15 पर्यंत सुरू राहणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...