‘अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स’चा उपक्रम
पुणे : ‘आयपीएल’चा क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेल्या रविवारी एमसीए स्टेडियमवर गेलेल्या हजारो प्रेक्षकांना ‘व्होडाफोन’तर्फे एक अनोखी भेट मिळाली. प्रवेशद्वार क्र. 2 मधून स्टेडियममध्ये चाललेल्या प्रेक्षकांना आतमध्ये गेल्यावर त्यांचे स्वतःचे चेहरे भल्यामोठ्या ‘एलईडी स्क्रीन’वर पाहायला मिळाले. व्होडाफोन इंडिया कंपनीने ‘अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स’ या उपक्रमातून क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ही व्यवस्था केली होती.
‘आयपीएल’चा अंतिम सामना पाहण्यासाठी रविवारी मोठीच गर्दी उसळली होती. 37 हजार प्रेक्षक बसू शकतील इतक्या क्षमतेचे एमसीए स्टेडियम त्या दिवशी पू्र्ण भरले होते. स्टेडियमच्या बाहेर ‘व्होडाफोन’च्या बूथवर येणाऱ्या प्रेक्षकांना दुपारी चार वाजल्यानंतर आपले चेहरे स्टेडियमच्या आतमधील मोठ्या स्क्रीनवर झळकलेले दिसले व त्यांना आश्चर्याचा व आनंदाचा सुखद धक्का बसला. सुमारे तीन हजार जणांना ‘व्होडाफोन’तर्फे ही भेट मिळाली.
‘व्होडाफोन इंडिया’चे महाराष्ट्र-गोवा विभागाचे प्रमुख आशिश चंद्रा यांनी सांगितले, ‘’वेगवेगळ्या क्रीडा सामन्यांमध्ये ‘व्होडाफोन इंडिया नेहमीच आपल्या पध्दतीने सामील होत असते. आपल्या ग्राहकांना वैविध्यपूर्ण अनुभव पारितोषिके आम्ही येथे देतो. क्रिकेटचे सामने आयोजित करण्याचे भाग्य पुण्याच्या वाट्याला आल्याने ‘व्होडाफोन’ने ही संधी घेण्याचे ठरविले. क्रिकेटचे चाहते असलेल्या आपल्या ग्राहकांना एक वेगळेच बक्षिस देण्याचे आम्ही ठरवले आणि ‘अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स’च्या माध्यमातून ग्राहकांना स्टेडियममध्ये आपला चेहरा स्क्रीनवर झळकलेला पाहण्याचा आनंदाचा क्षण आम्ही देऊ केला. एखाद्या सेलिब्रेटीला ज्या प्रकारे स्क्रीनवर आतुरतेने पाहिले जाते, तसे आपल्यालाही पाहिले जात असल्याचे लक्षात आल्यावर हे तीन हजार प्रेक्षक एकदम खूष झाले. एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या ग्राहकांना बक्षिस देता आले व या ग्राहकांशी नाते जोडता आले, याबद्दल ‘व्होडाफोन इंडियाला’ही अभिमान वाटतो.’’