शाश्वत कृषी क्षेत्रासाठीचे डिजीटल व्यासपीठ असलेली नर्चर.फार्म आता ओपनअॅग नेटवर्कचा भाग बनणार

Date:

मुंबई, १९ जुलै २०२१: शेतकरी, कृषी क्षेत्रात काम करणारे आणि अन्न व्यवस्था यांच्यासाठीचे डिजीटल व्यासपीठ (नर्चर.फार्म) nurture.farm आता ओपनअॅग™ नेटवर्कचा भाग बनताना आपली जागतिक पोहोच उंचावणार आणि विस्तारणार आहे. कृषी क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी यूपीएल लिमिटेडचे हे ओपनअॅग™ नेटवर्क आहे.

नर्चर.फार्म व्यासपीठामुळे शेतकरी लवचिक बनणार असून शेती सुलभ, किफायतशीर आणि कृषी जीवनचक्राच्या प्रत्येक पायरीला लपेटून घेत तंत्रज्ञान प्रणीत सुविधांमधून येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत बनणार आहे. यूपीएलने जोपासलेले नर्चर.फार्म हे उत्पादनांचा पुरवठा, नाविन्यपूर्णता आणि यांत्रिकीकरण यामध्ये खुले व्यासपीठ म्हणून कार्यरत राहील.

नर्चर.फार्म चा सीओओ आणि बिझनेस प्रमुख ध्रुव साव्ह्नेय म्हणाले, “कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या समाजावर नर्चर.फार्म चा असलेला प्रभाव हे जगभरात शाश्वत कृषी विकसीत करण्याच्या दिशेने आमची जी प्रगती सुरु आहे आणि त्यायोगे शेतकऱ्यांसाठी एक उज्ज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी मदत होत आहे त्याचेच निदर्शक आहे. बदलते हवामान, आर्थिक असुरक्षितता, माहिती आणि यांत्रिकीकरण यांचा अभाव असे असंख्य धोके आणि आव्हानं यांना शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना या डिजीटल व्यासपीठाची मदत होऊ आहे. आम्ही तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करताना पायाभूत सुविधा सर्वांसाठी निर्माण करून शाश्वततेशी बांधिलकी ठेवणाऱ्या शेतकरी आणि खरेदीदार यांना एका जागतिक समाजाच्या छताखाली आणत आहोत. आमचे हे क्रांतिकारी व्यासपीठ नवीन बाजारपेठांमध्ये नेताना शेतकऱ्यांसाठी परिस्थितीत बदल घडवून आणण्याकरता आणि संपूर्ण अन्न व्यवस्था अधिक मजबूत आणि शाश्वत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

“ओपनअॅग™ नेटवर्क मध्ये नर्चर.फार्म चे स्वागत करताना आम्हांला खूप आनंद होत आहे आणि शेतकरी तसेच जगभरातील अन्न सुरक्षा आणि शाश्वत कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्यांना संधीची दारे खुली करण्याच्या आमच्या ध्येयात ते जी भूमिका पार पाडतील त्याबद्दल आम्ही खूप भारावून गेलो आहोत. शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचण्यासाठी नर्चर.फार्म खरीखुरी ग्राहक केंद्री परिसंस्था निर्माण करत आहे. सर्वांसाठी समृद्धता आणि सर्वांसाठी शाश्वत विकास हे त्यांचे उद्दिष्ट आहे,” असे यूपीएलचे सिओओ कार्लोस पेलीसर म्हणाले.

एका समग्र दृष्टीकोनातून नर्चर.फार्मने सुलभता, संपर्कक्षमता आणि लवचिकता वाढविण्यासाठी आणि त्यायोगे शाश्वत परिणाम सुरक्षित करण्यासाठी एकात्मिक सुविधा पुरविणारी सर्वसमावेशक परिसंस्था विकसीत केली आहे. प्रमुख सुविधांमध्ये यांचा समावेश आहे: 

·         शेत- पीक आरोग्य सुविधा, सल्ला सेवा, शेत पातळी यांत्रिकीकरण आणि डिजिटलायझेशन यांच्याद्वारे कृषी जीवनचक्राच्या प्रत्येक पायरीवर अचूक शेती तंत्र राबवून शेतकऱ्यांना पाठबळ.

·         रिटेल- विश्वासार्ह, अस्सल आणि उच्च दर्जाची कृषी उत्पादने (पीक संरक्षण, बी-बियाणं, कृषी अवजारे इत्यादी) खरेदी करण्यासाठी शेतकरी आणि रिटेलर्सना सक्षम करणे

·         व्यापार- शेतकरी आणि खरेदीदार यांच्यामधील संपर्कसुविधा वाढविणे, माहिती मध्ये पारदर्शकता आणि बाजारपेठांची सुलभ उपलब्धता

·         शाश्वतता- पुनर्योजी पद्धती वापरून जागतिक पातळीवर शाश्वत शेतीचा पुरस्कार आणि अशा प्रकारे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

२०२०च्या सुरुवातीला स्थापन झालेल्या नर्चर.फार्मचा स्तर आणि प्रभाव दोन्ही उंचावला असून आजच्या घडीला आपल्या डिजीटल व्यासपीठावरून १० लाखाहून अधिक शेतकरी आणि ५०,००० किरकोळ विक्रेते यांना ते पाठबळ देत आहेत. २.५ दशलक्षाहून आधी एकर शेतजमीनीवर काम सुरु आहे. भारतभरात या व्यासपीठाला मोठा प्रतिसाद मिळत असून अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या इतर मुख्य बाजारपेठांमध्ये असंख्य आश्वासक पथदर्शी प्रकल्प आकाराला येत आहेत.

शाश्वत अन्न व्यवस्था निर्माण करण्याच्या आपल्या ध्येयाचा एक भाग म्हणून नर्चर.फार्म उत्पादन, सेवा आणि प्रकल्प यांच्या निवडीमधून पुनर्योजी कृषी पद्धतींना प्रोत्साहन देत आहे. असंख्य नवीन उपक्रमांना चालना देत आहे. त्यामध्ये कापणीनंतर राहिलेल्या धान्याच्या रोपांचे खुंट, जैविक उत्पादनं जाळण्याची पद्धत टाळणे आणि या ध्येयासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान करणे यांचा समावेश आहे.

यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जय श्रॉफ म्हणाले, “नर्चर.फार्म हा ओपनअॅग™ नेटवर्क मधला सर्वाधिक उत्साहवर्धक उपक्रम आहे. जगभरातील शेतकरी आणि अन्न व्यवस्था यांसाठी संधीची दारे उघडताना आपले अन्नदाते आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांना समृद्धता देण्यासाठी आणि वातावरणीय शाश्वततेला पाठबळ देण्याचे काम केले जात आहे. भारतातील नर्चर.फार्मच्या कार्याला मिळत असलेले यश आणि जोडीला पुढे जाऊन त्यांचे पथदर्शी प्रकल्प यातून या व्यासपीठातून पुरविली जाणारी मुल्ये सादर होत आहेत. नर्चर.फार्मचा आगामी काळातला विस्तार आणि प्रभाव याला माझा पाठींबा आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...