डीबीएस बँकेतर्फे तरुणांना रोजगारपुरवठा करण्यासाठी टीआरआरएआयनबरोबर भागिदारी

Date:

मुंबई, – अर्थार्जनाच्या संधींची निर्मिती आणि जतन करण्याच्या बांधिलकीला अनुसरून डीबीएस बँक इंडियाने आज टीआरआरएआयन (ट्रस्ट फॉर रिटेलर्स अँड रिटेल असोसिएट्स ऑफ इंडिया) या ना- नफा तत्वावर काम करणाऱ्या आणि तरुणांना प्रशिक्षण व ई- कॉमर्स व रिटेल क्षेत्रात रोजगार मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या संस्थेशी भागिदारी केल्याचे जाहीर केले आहे. या भागिदारीमुळे कमी उत्पन्न गटातील तरुणांना दीर्घकालीन रोजगाराच्या संधी मिळतील.

या भागिदारीच्या माध्यमातून डीबीएस कोविड महामारीचा फटका बसलेल्या तरुणांना तसेच दिव्यांग व्यक्तींना एक वर्ष कालावधीच्या पॅन भारत अभ्यासक्रमाचद्वारे कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार देणार आहे. या अभ्यासक्रमात वर्गातील तसेच ऑनलाइन प्रशिक्षण वर्गाचा योग्य मेळ घालण्यात आला आहे. हे प्रशिक्षण मुंबई, चेन्नई, दिल्ली- एनसीआर, बेंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद अशा प्रमुख शहरांतील टीआरआरएआयनच्या केंद्रात दिले जाणार आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची पहिल्या व दुसऱ्या श्रेणीतील शहरात रिटेल आणि ई- कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांद्वारे भरती केली जाईल. या अभ्यासक्रमाद्वारे 2021 च्या अखेरपर्यंत 800 जणांना प्रशिक्षण आणि रोजगार पुरवण्याचे उद्दिष्ट आहे.

डीबीएस बँक इंडियाच्या समूह धोरणात्मक विपणन आणि संवाद विभागाचे कार्यकारी संचालक शोमा नारायणन म्हणाले, ‘समाजाला अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी आणि बँकिंग पलीकडे जात परिणाम घडवून आणण्यासाठी डीबीएस बांधील आहे. महामारीची झळ सोसलेल्यांना परत उभारी देणाऱ्या उपक्रमांत आम्ही सक्रिय सहभाग घेत आहोत. टीआरआरएआयनबरोबर करण्यात आलेली भागिदारी अशाच प्रकारचा एक उपक्रम असून त्याअंतर्गत दिव्यांग तसेच तरुणांचा कौशल्य विकास केला जाईल आणि त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या जातील.’

‘ट्रस्ट फॉर रिटेलर्स अँड रिटेलर्स असोसिएट्स ऑफ इंडियाला दिव्यांग तसेच वंचित वर्गाला अर्थार्जनाच्या शाश्वत संधी मिळवून देण्यासाठी डीबीएस बँकेबरोबर भागिदारी करताना आनंद होत आहे. डीबीएस बँकेच्या मदतीने आम्ही 400 दिव्यांग व्यक्ती तसेच 425 वंचित तरुण व्यक्तींना रिटेल क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळवून देत त्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणत आहोत. यापुढेही डीबीएस बँकेबरोबर परिणामकारक आणि अखंडित सीएसआर भागिदारी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’ असे टीआरआरएआयनचे संस्थापक आणि सेटलर बी एस नागेश आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमीशा प्रभू म्हणाले.

ट्रेनबरोबर करण्यात आलेली भागिदारी ही बँकेने ‘डीबीएस स्ट्राँगर टुगेदर फंड’चा भाग म्हणून जाहीर केलेल्या उपक्रमांच्या मालिकेतील सर्वात नवे काम आहे. 2020 मधे बँकेने कोव्हिड- 19 च्या पार्श्वभूमीवर या महामारीचा सर्वाधिक फटका बसलेल्यांना प्रदेशांतील समाजांना मदत करण्यासाठी जागतिक एसजीडी 10.5 दशलक्षचा फंड स्थापन केला होता. या फंडाद्वारे बँकेने 4.5 दशलक्ष लोकांना जेवण आणि सिंगापूर, हाँग काँग, चीन, भारत, इंडोनेशिया आणि तैवान येथील ग्रस्त लोकांना केयर पॅक्स पुरवले होते. डीबीएसने 2020 मधे ‘टुवर्ड्स झिरो फूड वेस्ट’ हा उपक्रम सादर करत त्याद्वारे खाद्यपदार्थांची नासाडी करण्याची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत आहे. खाद्यपदार्थांच्या नासाडीचे प्रमाण शून्यावर आणण्याप्रती असलेल्या बांधिलकीतून बँकेने शाश्वत, अन्नाच्या बाबतीत सक्षम भविष्य उभारण्याचे ध्येय ठेवले असून त्याला तीन शाश्वत स्तंभांची – जबाबदार बँकिंग, जबाबदार बँकिंग पद्धती आणि सामजिक प्रभाव निर्मिती यांची जोड दिली जाणार आहे.

2020 मधे ‘डीबीएस स्ट्राँगर टुगेदर’ या उपक्रमाअंतर्गत डीबीएस बँकेने 10 स्वयंसेवी संस्थांशी देशात लॉकडाउन असलेल्या ठिकाणी मदत पुरवण्यासाठी भागिदारी केली होती. यापूर्वी डीबीएस बँक इंडियाने युनायटेड वे मुंबई, प्रथम मुंबई एज्युकेशन उपक्रम, गुंज आणि ओला फाउंडेशन अशा विविध संस्थांशी भागिदारी करून महामारीचा फटका बसलेल्यांना खाद्यपदार्थांचा पुरवठा आणि पॅकेज्ड मील्सच्या स्वरुपात दोन दशलक्ष वंचितांना जेवणाचे वाटप केले होते. त्याशिवाय बँकेने युनिसेफ, युनायटेड वे, मेट्रोपोलिस लॅब्ज आणि इतर संस्थांशी सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा विस्तारणे, वैद्यकीय गोष्टी आणि उपकरणांचा पुरवठा आणि वंचितांसाठी प्रायोजकत्व मुक्त चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी भागिदारी केली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...