मुंबई: 19 अब्ज उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनने (एमटीबीडी) मे. रंधवा मोटर्स या मुंबईतील नव्या, अद्ययावत डीलरशिपचे उद्घाटन केले आहे व डीलरशिपची एकूण संख्या 93 पर्यंत वाढवली आहे. अलीकडेच, एमटीबीडीने आर्थिक व व्हॉल्युमच्या बाबतीत पुन्हा उभारी घेतली आहे व हे प्रमाण आर्थिक वर्ष 18 मधील या क्षेत्राच्या वाढीच्या जवळजवळ दुप्पट आहे.
या वेळी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्राच्या कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट विभागाचे व महिंद्रा ट्रक अँड बसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद सहाय यांनी सांगितले, “एमटीबीडी भारतातील सीव्ही क्षेत्रात स्वतःचे अतिशय खास व आघाडीचे स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. एचसीव्ही श्रेणीतील विशिष्ट बाजारपेठ व विशिष्ट श्रेणीमध्ये आम्ही अगोदरच तिसऱ्या स्थानावर आहोत आणि आता एकंदर तिसरे स्थान साध्य करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. नवी आयसीव्ही उत्पादने विकसित करण्यासाठी अंदाजे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून, येत्या काळात परिपूर्ण व्यावसायिक वाहन कंपनी बनण्यासाठीही एमटीबीडी कार्यरत आहे. आमच्या डीलरशिपमध्ये नव्याने झालेली वाढ, तसेच नवी ब्लेझो एचसीव्ही उत्पादने व मायलेज, सर्व्हिस व स्पेअरची हमी यामुळे ग्राहकांना सेवा देण्याची आमची क्षमता लक्षणीय प्रमाणात वाढून बाजारातील आमचे स्थान आणखी बळकट होईल.”
मुंबईतील बाजारपेठेविषयी बोलताना सहाय यांनी नमूद केले, “मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र असल्याने तेथे हेव्ही व लाइट कमर्शिअल व्हेइकल्ससाठी प्रचंड वा आहे आणि एमटीबीडी ग्राहक सेवेच्या बाबतीत नवी प्रमाणके निर्माण करण्यासाठी मे. रंधवा मोटर्स अशा डीलर पार्टनरच्या सक्षम जाळ्याद्वारे या बाजारपेठेला सेवा देणार आहे”.
डीलरशिपच्या उद्घाटनानिमित्त बोलताना, रंधवा मोटर्सचे व्यवस्थाकीय संचालक एम. एस. रंधवा यांनी सांगितले, “आम्ही महिंद्रा ट्रक अँड बसच्या बरोबर ग्राहकांसाठी नवी डीलरशिप सुरू करत असल्याने ट्रकिंग उद्योगातील नव्या अध्यायाचा एक भाग बनताना आम्हाला अतिशय अभिमान व सन्मानित वाटते आहे. या क्षेत्रातील आमच्या सखोल ज्ञानाचा वापर करून अशीच उच्च प्रमाणके वापरण्याची संधी आम्हाला या डीलरशिपमुळे मिळणार आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी व त्यांनी चांगली कामगिरी करावी यासाठी आम्ही एकत्रित काम करणार आहोत.”
ग्राहकांकडे असलेल्या सध्याच्या ट्रकच्या तुलनेत अधिक इंधनक्षमता देणारा ट्रक यासह सहा हमी देणारा महिंद्रा ब्लेझो हा भारतातील एकमेव ट्रक आहे, अन्यथा ग्राहकांना त्यांचा ट्रक परत करता येऊ शकतो. एमटीबीडीने 48 तासांत ट्रक पुन्हा सुरळीत सुरू करण्याची हमी देऊन ब्रेकडाउन सेवेतील अपटाइमविषयीही खात्री दिली आहे, अन्यथा कंपनी ग्राहकाला दररोज 1000 रुपये देणार आहे. तसेच, डीलर वर्कशॉपमध्ये वाहनाचा खात्रीशीर टर्नअराउंड 36 तास आहे, अन्यथा कंपनी दररोज 3000 रुपये देईल.
एमटीबीडीची मायलेजची हमी म्हणजे उत्कृष्ट इंजिनीअरिंग आणि ग्राहकांना अप्रतिम मूल्य देण्याचा निश्चय यांचे प्रतिक आहे. समूहाने केलेले सहयोग आणि सर्व्हिस टच पॉइंट्स व स्पेअर्स रिटेलर नेटवर्क यांची वाढ यांचा लाभ घेऊन कंपनीने आफ्टर-सेल्स नेटवर्कवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने सर्व्हिस व स्पेअर्सची हमी ही संकल्पना निर्माण झाली. उत्पादनामध्ये सातत्याने नावीन्य व ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन ही एमटीबीडीची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत व त्यामुळे ही हमी देणे शक्य झाले आहे.
महिंद्रा ट्रक अँड बसविषयी
महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजन ही 19 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा एक भाग व संपूर्ण मालकीची उपकंपनी असून ती सर्व एकात्मिक ट्रकिंग सेवा पुरवते. कंपनीने विशिष्ट प्रकारच्या वापरासाठी खास पद्धतीचे ट्रक तयार करून व व्यवसायाच्या गरजेनुसार अप्रतिम कामगिरी करून आपले स्थान उंचावले आहे. उत्तम कामगिरी करणारी वाहने, विक्रीनंतर तत्पर सेवा, विस्तारित वॉरंटी व अन्य अनेक फायदे यामुळे महिंद्राने भारतीय ट्रकिंग उद्योगात नवा मैलाचा दगड निर्माण केला आहे.
महिंद्रा ट्रक अँड बसतर्फे एकात्मिक ट्रकिंग सुविधा दिल्या जातात, ज्या प्रत्येक बाबतीत महिंद्राच्या उत्कृष्ट सेवांबरोबरच, ग्राहकांना झटपट सुविधा व विश्वासार्हता असे फायदे देऊन नफा मिळवण्यास मदत करतात. एचसीव्ही उत्पादने भारतीय ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन तयार करण्यात आली आहेत व त्यामध्ये मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया या विचाराचा अवलंब केला आहे. एचसीव्ही श्रेणीमध्ये, महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनचे 40,000 हून अधिक एचसीव्ही ट्रक रस्त्यावर धावत आहेत. कंपनी व्यावसायिक वाहन बाजारातील प्रत्येक श्रेणीला सेवा देण्यासाठी कार्यरत आहे; कार्गो व स्पेशलाइज्ड लोड वापराच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या प्रकारांबरोबर 3.5 टन जीव्हीडब्लू ते 49 टन जीव्हीडब्लू. अवजड व्यावसायिक वाहनांच्या ब्लेझो रेंजचे उत्पादन चाकणमधील ग्रीन फिल्ड प्रकल्पामध्ये केले जाते. अंदाजे 700 एकरांमध्ये विस्तारलेला प्रकल्प 4,000 कोटी रुपये गुंतवणूक करून उभारला आहे व महिंद्राच्या अन्य उत्पादनांचीही निर्मिती करतो. यामुळे महिंद्रा समूहाला एकात्मिक उत्पादन सुविधेच्या समन्वयाचा लाभ घेणे शक्य होते. कंपनी 6 वर्षे किंवा 6 लाख किमी ट्रान्स्फरेबल वॉरंटी देते व ती या क्षेत्रातील पहिली आहे व किंमतक्षम एएमसी आहे.एलसीव्ही श्रेणीमध्ये, महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनचा बाजारहिस्सा 9.4% आहे. अंदाजे 1,85,000 वाहने अगोदरच भारतीय रस्त्यावर धावत असून देशभर कंपनीचे स्थान अधिक सक्षम होणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या जहीराबाद येथील प्रकल्पात एलसीव्ही लोड व्हेइकल व बस यांची निर्मिती केली जाते. महिंद्रा ट्रक अँड बसने विक्रीनंतरच्या सेवेमध्ये व स्पेअर्स नेटवर्कमध्ये झपाट्याने वाढ केली असून त्यामध्ये 93 संख्येने 3S डीलरशिप, 149 हून अधिक अधिकृत सर्व्हिस सेंटर, 32 एम-पार्ट्स प्लाझा व 2,900 रोडसाइड असिस्टन्स पॉइंट आहेत; आणि ग्राहकांना महत्त्वाच्या ट्रकिंग मार्गावर आणखी पाठिंबा देण्यासाठी स्पेअर्स नेटवर्कमध्ये 2,000 नेटवर्क पॉइंट्सचा समावेश आहे. कंपनीची नाऊ ही भारतातील पहिली बहुभाषीय 24X7 हेल्पलाइन असून ग्राहकांना व चालकांना तातडीने पाठिंबा उपलब्ध करण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञ तिच्याशी जोडलेले आहेत. नाऊ मोबाइल सर्व्हिस व्हॅन व मोबाइल वर्कशॉप यामुळे सपोर्ट नेटवर्कची व्याप्ती व तत्परता वाढते.