वाय-फाय आणि घरून काम यामुळे पुणेकर होत आहेत तणावग्रस्त

Date:

कोविड-१९ वैश्विक महामारीमुळे फक्त उद्योगधंद्यांनाच खीळ बसली असे नव्हे तर आपल्या सर्वांच्या वस्तू वापराच्या पद्धती आणि आपल्या जगण्याच्या पद्धतीवरही याचा परिणाम झाला आहे.  या विषाणूने आपल्याला घरून काम करायला भाग पाडले आणि ऑनलाईन शिक्षण आता नवी सर्वसामान्य प्रणाली बनले आहे. साहजिकच सगळ्यांचाच स्क्रीनसमोर घालवला जाणारा वेळ लक्षणीय प्रमाणात वाढला आहे, शारीरिक हालचाली कमी झाल्या त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रचंड परिणाम होऊ लागला आहे.  इतक्या वर्षांचे ठरलेले दिनक्रम पूर्णपणे बदलले आणि आता लोकांना घरून काम व घरातील काम अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे.  लॉकडाउन सुरु झाल्यापासून एका आठवड्याच्या आत मानसिक आरोग्यासंदर्भात नोंद करण्यात आलेल्या केसेसची संख्या २०% नी वाढली. [1]   

टाटा सॉल्ट लाईटतर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की पुणेकरांच्या बाबतीत राग आणि तणाव निर्माण होण्यामागील सर्वात पहिल्या कारणांमध्ये कामाशी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांचा समावेश होता.  सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी जवळपास ९४% व्यक्तींनी असे मान्य केले की जर त्यांना त्यांच्या सुट्टीच्या दिवशी काम दिले गेले किंवा शुक्रवारी एखाद्या तातडीच्या कामासाठी उशिरापर्यंत काम करण्यास सांगितले गेले तर त्यांना खूप राग येईल, त्यांच्याकडून कामात चुका होतील किंवा वरिष्ठांसोबत वादावादी देखील होईल.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी जवळपास अर्ध्या व्यक्तींनी (५०%) असे सांगितले की त्यांचे वाय-फाय कनेक्शन किंवा इंटरनेट अचानक बंद पडले तर त्यांना राग आणि वैताग येईल तर दर पाचपैकी तीन (६२%) व्यक्तींनी मान्य केले की त्यांचा फोन चार्ज होत असताना कोणी तो अनप्लग केला तर त्यांना खूप राग येईल.

शांत आणि सकारात्मक कसे राहता येईल याबद्दल आरोग्यदायक टिप्स सांगताना टाटा न्यूट्रीकॉर्नरच्या न्युट्रीशन एक्स्पर्ट श्रीमती कविता देवगण यांनी प्रामुख्याने सांगितले, “जेवणाच्या वेळी कुटुंबियांसमवेत जेवणे हे एवढेच एक काम करा आणि आरोग्यदायक आहार घ्या.  तुमच्या दररोजच्या जेवणात सहा धान्यांपासून बनवलेली खिचडी, अनेक कडधान्यांपासून बनवलेले धिरडे किंवा घावन, कमी तेल शोषून घेणारे बेसन, लाल तांदुळाचे पोहे अशा पारंपरिक भारतीय पदार्थांचा समावेश आवर्जून करा.  आपल्या जीवनशैलीमध्ये आरोग्याला लाभदायक ठरतील असे बदल करा.  घरून काम करताना मध्ये-मध्ये जागेवरून उठणे, दर तासाला थोडेफार चालणे हे नक्की करा.  रेस्टोरंट्समधून खाणे मागवण्यापेक्षा घरी बनवलेले भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ खा.  घरी करता येईल असा एखादा व्यायाम प्रकार करा आणि दर रात्री सहा ते आठ तास शांत झोपा.”   

आरोग्याला अपायकारक खाणे, तणाव, बैठे काम यामुळे हृदयविकार, काही प्रकारचे कर्करोग आणि मधुमेह यासारखे आहाराशी संबंधित असंसर्गजन्य (नॉन-कम्युनिकेबल) आजार होऊ शकतात.  जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आरोग्याला अपायकारक आहार आणि अपुरे पोषण या जगभरात असंसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरत असलेल्या सर्वात गंभीर बाबी आहेत.

टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (टीसीपीएल)

टाटा समूहाची खाद्य आणि पेय उत्पादने एकाच छत्राखाली आणणारी टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ही ग्राहकोपयोगी उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून वाटचाल करत असलेली कंपनी आहे.  या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये चहा, कॉफी, पाणी, मीठ, कडधान्ये, मसाले आणि रेडी-टू-इट खाद्यपदार्थ आहेत. टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ही जगातील दुसरी सर्वात मोठी ब्रँडेड टी कंपनी आहे.  त्यांच्या महत्त्वाच्या बेव्हरेजेस ब्रॅंड्समध्ये टाटा टी, टेटले, एट ओ क्लॉक कॉफी, टाटा कॉफी ग्रँड आणि हिमालयन नॅचरल मिनरल वॉटर यांचा समावेश आहे.  त्यांच्या खाद्यपदार्थांच्या उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा सॉल्ट आणि टाटा संपन्न यांचा समावेश आहे.  भारतात टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्स २०० मिलियनपेक्षा जास्त कुटुंबांमध्ये पोहोचली असून त्यामुळे ग्राहकोपयोगी उत्पादनांमध्ये टाटा ब्रँडचा लाभ घेण्याची अतुलनीय क्षमता कंपनीला मिळाली आहे.  वार्षिक ~१०,००० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या या कंपनीमध्ये ब्रँडेड बिझनेसमध्ये २२०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

⁠खासदार क्रीडा महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने समारोप पुणे (प्रतिनिधी) :...

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर मुंबई | दि. २५...