‘गोदरेज अप्लायन्सेस’तर्फे आरोग्य व स्वच्छता यांसाठी ‘गोदरेज व्हिरोशील्ड 4.0’ सादर

Date:

गोदरेज अप्लायन्सेसतर्फे आरोग्य व स्वच्छता यांसाठी गोदरेज व्हिरोशील्ड 4.0 सादर;
यूव्हीसी तंत्रज्ञान आधारित जंतुनाशक उपकरणाद्वारे
कोविड-19 व इतर विषाणूंवर 99 टक्के मात

यूव्हीसी किरणाच्या उत्सर्जनाबाबत आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून प्रमाणित गोदरेज व्हिरोशील्डमधून कोविड-19 व अन्य विषाणू 2 ते 6 मिनिटांत होतात निष्प्रभ

ऑगस्ट 14, 2020 : सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या संदर्भात, ‘कोव्हिड-19’च्या साथीमुळे भारतीय ग्राहकांच्या वर्तणुकीत महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. ‘कोरोना’च्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी ग्राहक स्वत:चे प्रयत्न करीत आहेत. दररोज घरात येणाऱ्या व वापरल्या जाणार्‍या गोष्टी धुण्यासाठी, त्यांची स्वच्छता करण्यासाठी किंवा त्या वस्तू वेगळ्या ठेवण्यासाठी ग्राहक वेळ आणि शक्ती खर्च करताना दिसत आहेत. आणि तरीही ते अवलंबीत असलेल्या पद्धतींच्या प्रभावीपणाची त्यांना कोणतीही खात्री मिळत नाही. कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे, की 60 टक्क्यांहून अधिक ग्राहक त्यांच्याकडे आलेली पार्सल्स व पाकिटे एका दिवसापेक्षा जास्त काळ अलग ठेवतात, काहीजण घरी आणलेल्या भाज्या धुवून दिवसभरापेक्षा जास्त वेळ बाजूला ठेवतात, तर काहीजण चक्क भाज्या साबणाच्या पाण्याने धुवून काढतात.

ग्राहकोपयोगी वस्तूंचे गेली 62 वर्षे उत्पादन करणारी भारतातील आघाडीची कंपनी, गोदरेज अप्लायन्सेस हिने भारतीय ग्राहकांच्या गरजा नेमक्या ओळखून योग्य ते तंत्रज्ञान उपयोगात आणण्याचे नेहमीच प्रयत्न केले आहेत. ‘कोरोना व्हायरस’च्या संकटात या कंपनीने पुन्हा एकदा आपले प्रसंगानुरुप योग्य ठरणारे खास भारतीय बनावटीचे उत्पादन भारतीय ग्राहकांसाठी निर्माण केले आहे. ‘अल्ट्रा व्हायोलेट–सी’ तंत्रज्ञानावर आधारीत गोदरेज व्हिरोशील्ड 4.0 हे नवे उपकरण कंपनीने सादर केले आहे. यामध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू केवळ 2 ते 6 मिनिटांच्या अवधीत 99 टक्के निर्जंतूक होतात, त्यायोगे त्या ‘कोरोना व्हायरस’पासून निर्धोक होतात. यातील 254 एनएम इतक्या तरंगलांबीच्या अतिनील किरणांमुळे ‘कोविड-19’चे, तसेच इतरही विषाणू, जीवाणू निष्प्रभ होतात. उत्पादनांच्या गुणवत्तेविषयी विश्वासार्हता मिळवलेल्या या ब्रॅंडने ‘व्हिरोशील्ड’च्या अनेक चाचण्या घेतल्या आहेत आणि यूव्ही-सी किरणांच्या उत्सर्जनाबाबत ‘आयसीएमआर’ मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून प्रमाणपत्रही घेतले आहे.

सुरक्षितता व स्वच्छता या दोन्ही बाबींची पुरेपूर काळजी घेतली जाईल, अशा पद्धतीने ‘व्हिरोशील्ड’ची रचना करण्यात आली आहे. ‘यूव्ही सराऊंड’ तंत्रज्ञानाच्या संकल्पनेनुसार, ‘गोदरेज व्हिरोशील्ड 4.0’ मध्ये 4 ‘यूव्ही-सी ट्यूब’ आणि 6 ‘साईड रिफ्लेक्टिव्ह इंटिरिअर्स’ बसविण्यात आले आहेत. या क्षमतेच्या अशा उपकरणामध्ये बसविण्यात आलेली ही सर्वोच्च स्तरावरील रचना आहे. यामुळे ‘व्हिरोशील्ड’च्या आतमध्ये 360 अंश कोनांत यूव्ही-सी किरणे पोहोचू शकतात. ‘व्हिरोशील्ड’च्या चौकोनी आकारामुळे त्याच्या अंतर्गत भागात सगळीकडे यूव्ही-सी किरणांची तीव्रता समान राहते. धान्याच्या पाकिटांपासून भाज्या, मोबाईल फोन, फेसमास्क, सोन्याचे दागिने, हेडफोन, गाडीच्या किल्ल्या, खेळणी, चलनी नोटा, पैशाचे पाकीट, चष्मा अशा कोणत्याही वस्तू यामध्ये त्वरीत निर्जंतूक होतात.

तीस लिटर इतक्या त्याच्या आकारमानामुळे आपण एकाचवेळी अनेक लहान-मोठ्या वस्तू निर्जंतूक करू शकतो आणि आपला वेळ व ऊर्जा वाचवू शकतो. वस्तू वा भाज्या धुणे, वाळवणे, वेगळ्या ठेवणे, अशा गोष्टी करण्याने फायदा होतो किंवा नाही हेही माहीत नसताना, त्या करीत राहण्याचा व्याप या उपकरणाने वाचतो. 

गोदरेज अप्लायन्सेस हा ब्रॅंड ग्राहकांच्या सुरक्षेबाबत अतिशय काटेकोर आहे. ‘यूव्ही-सी’च्या थेट संपर्कात जास्त वेळ राहिल्यास ते मानवी शरिराला घातक असते, हे लक्षात घेऊन ‘व्हिरोशील्ड’ची रचना करण्यात आली आहे. अपारदर्शक पृष्ठभाग, जाडजूड दरवाजे व इतर बाजू आणि गास्केट आधारीत मॅग्नेटिक सिलिंग सिस्टीम, तसेच दरवाजा उघडल्याबरोबर आपोआप थांबणारी यंत्रणा अशी या उपकरणाची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच, ‘गोदरेज व्हिरोशील्ड 4.0’ हे मानवी सुरक्षेच्या दृष्टीने शंभर टक्के यूव्ही लीकप्रूफ आहे. त्यातून किरणांची गळती होत नाही, याच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्याबाबतचे प्रमाणपत्रही कंपनीला मिळाले आहे.

‘गोदरेज व्हिरोशील्ड’वर 1 वर्षाची व्यापक स्वरुपाची वॉरंटी देण्यात आली आहे. या वॉरंटीमध्ये ‘यूव्ही-सी’च्या ‘लॅम्प’चाही समावेश आहे. गोदरेजच्या विक्रीपश्चात सेवेच्या यंत्रणेचे पाठबळ या उपकरणाला लाभले आहे.

नेत्रसुखद पांढऱ्या रंगातील, 30 लिटर क्षमतेच्या व अनेकविध वैशिष्ट्यांनी युक्त अशा ‘गोदरेज व्हिरोशील्ड 4.0’ची किंमत 9490 रु. अशी आकर्षक ठेवण्यात आली आहे. यामध्ये कर समाविष्ट आहेत.  

व्हिरोशील्ड सादर करताना ‘गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “कोविड साथीचा स्पष्ट परिणाम ग्राहकांच्या वर्तनावर झाला आहे. आरोग्य आणि स्वच्छता यांबाबत आमचे ग्राहक सतत चिंताग्रस्त असतात. ‘‘विचारपूर्वक बनवलेल्या गोष्टी’’ या ब्रँड तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आम्ही ग्राहकांचा दृष्टीकोन आणि त्यांच्या सद्य गरजा यांवर आधारित उत्पादने देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आरोग्य, स्वच्छता आणि कमी कष्ट या संकल्पनांचा एकत्रित विचार करून विविध तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांच्यावर आम्ही काम करीत आहोत. त्याच अनुषंगाने आम्ही आमच्या ग्राहकांसाठी गोदरेज व्हिरोशील्ड 4.0 सादर करीत आहोत. ‘यूव्ही-सी’ तंत्रज्ञान-आधारित निर्जंतुकीकरणाचे हे उपकरण आमच्या ग्राहकांना आणि त्यांच्या प्रियजनांना ‘कोविड-19’ व इतर विषाणू व जीवाणू यांच्यापासून संरक्षण देऊ शकते. आमच्या ग्राहकांना ‘न्यू नॉर्मल’ ही संकल्पना स्वीकारीत असताना कोणताही धोका पत्करावा लागू नये आणि त्यांनी चिंतामुक्त असावे, हीच आमची इच्छा आहे.”

गोदरेज अप्लायन्सेसचे प्रॉडक्ट ग्रुप हेड (रेफ्रिजरेटर्स) अनुप भार्गव म्हणाले, “कोरोनाच्या संसर्गापासून आपण कसे वाचू, याची भिती प्रत्येकाच्या मनात आहे. अशावेळी आमच्या ग्राहकांना ‘कोविड-19’, इतर विषाणू व जीवाणू यांच्यापासून वाचवण्यासाठी आम्ही नवीन ‘गोदरेज व्हिरोशील्ड 4.0’ सादर करीत आहोत, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. यूव्ही-सी किरणाच्या उत्सर्जनाबाबत ‘आयसीएमआर’ मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून प्रमाणपत्र मिळालेल्या ‘व्हिरोशील्ड’मधून ‘कोविड-19’पासून केवळ 2 ते 6 मिनिटांच्या अवधीत 99 टक्के निर्जंतुकीकरण करून मिळते. 360 अंशातील ‘यूव्ही सराऊंड’ तंत्रज्ञान व शंभर टक्के ‘यूव्ही लीकप्रूफ’ आणि इतरही अनोखी वैशिष्ट्ये असलेले गोदरेज व्हिरोशील्ड 4.0 हे 30 लिटर क्षमतेचे उपकरण अतिशय आकर्षक किंमतीत उपलब्ध होत आहे. हे उपकरण सादर केल्यापासूनच्या वर्षभरात 40 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे. ‘अॅमेझॉन’वर हे उपकरण अगोदरच, त्यांच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ऑनलाइन जाहिरातींसाठी आम्ही आमच्या ई-कॉम भागीदारांशी समन्वय साधून आहोत. आम्ही या महिन्यातच आमच्या नेटवर्कवर देशभरात हे उपकरण उपलब्ध करुन देऊ. ‘व्हिरोशील्ड’चा उत्कृष्ट मूल्य प्रस्ताव आणि त्याला मिळणारा सकारात्मक अभिप्राय यांतून आम्हाला या आर्थिक वर्षात बाजारात 20 टक्के हिस्सा मिळण्याचा आत्मविश्वास वाटतो आहे.’’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...