‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’च्या ‘बँकशुरन्स’ करारावर यूको बॅंकेची स्वाक्षरी; बॅंकेच्या देशभरातील ग्राहकांना आयुर्विमा योजना उपलब्ध

Date:

कोलकाता, 22 जून, 2020 : ‘यूको बॅंक’ भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची आणि  देशातील सर्वात विश्वासार्ह खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेली ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’ यांनी ‘बँकशुरन्स’ करार केला आहे. यामध्ये यूको बॅंकेच्या देशभरातील 3,086 शाखांमध्ये तिच्या ग्राहकांना व्यापक स्वरुपाच्या विमा योजना मिळू शकतील.

यूको बॅंकेच्या रिटेल बॅंकिंग, एमएसएमइ व ‘बँकशुरन्स बिझनेस’ या विभागांचे सरव्यवस्थापक निधू सक्सेना आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे कोलकता प्रदेश विभागाचे प्रादेशिक संचालक अश्विनीकुमार शुक्ला यांनी या ‘बँकशुरन्स’ करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

‘एसबीआय लाइफ’ देशात सातत्याने आपल्या विमा योजनांच्या वितरणाची व्यवस्था वाढवीत आहे. बँका, कॉर्पोरेट एजंट्स, दलाल, विमा विपणन संस्था आणि इतरांशी याबाबत अर्थपूर्ण सहकार्य या कंपनीने साधले आहे. यूको बॅंकेशी केलेल्या भागीदारीतून,  ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’तर्फे मोठ्या लोकसंख्येसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

या भागीदारीवर बोलताना एसबीआय लाइफच्या झोन क्र. 3  चे प्रेसिडेंट रवींद्र कुमार म्हणाले, “विम्याची व्याप्ती सार्वत्रिक स्वरुपात व्हावी आणि त्यातून देशाची सेवा करता यावी, यासाठी जागतिक स्तरावरील संस्थांशी भागीदारी करणे महत्त्वाचे आहे. यूको बॅंकेशी भागीदारी करण्यातून आम्ही या दिशेने पावले टाकली आहेत. यातून ‘एसबीआय लाइफ’ला देशभरातील नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल व त्यांना आयुर्विम्याचे छत्र पुरविता येईल. यूको बॅंकेची देशभरातील उपस्थिती व शाखांचे जाळे आणि ‘एसबीआय लाइफ’ची डिजिटल स्वरुपाची सेवा यांच्या माध्यमातून आम्ही मोठ्या लोकसंख्येला विम्याचे समग्र लाभ देण्यास समर्थ ठरू. या भागीदारीतून दोन्ही संस्था ग्राहक हितासाठी आपापल्या सामर्थ्याच्या बळावर संधी निर्माण करीत आहेत.”

यूको बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अतुलकुमार गोयल यावेळी म्हणाले, ‘’आमच्या ग्राहकांसाठी उच्च मूल्ये प्रस्थापित करण्याचे आमचे ध्येय नेहमीच असते. नव्या भागीदारीमुळे आम्ही अतिशय विस्तृत स्वरुपाच्या विमा योजना ग्राहकांपुढे मांडू शकू. या योजनांची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या किंमती यांच्या विचार करून ग्राहकांच्या हिताची मूल्ये त्यांना मिळवून देण्याचे आमचे प्रयत्न राहतील.’’

यूको बॅंकेचे कार्यकारी संचालक अजय व्यास या प्रसंगी म्हणाले, ‘’आमच्या ग्राहकांसाठी व्यापक स्वरुपाच्या विमा योजना उपलब्ध करून त्यांना आर्थिक संपन्नता मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. हे आमचे उद्दीष्ट या नव्या करारांमधून साध्य होईल. ग्राहकांना बॅंकेशी सुलभतेने व्यवहार करता यावेत, यासाठी बॅंकेतील प्रणाली ही डिजिटल व स्वयंचलित स्वरुपाची करण्याचे आम्ही ठरविले आहे.’’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...